Post viral fatigue: ताप गेल्यानंतरही अशक्तपणा जात नाहीये? या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Surabhi Jayashree Jagdish

व्हायरल इन्फेक्शन

ताप, डेंग्यू, फ्लू, कोविड किंवा इतर व्हायरल संसर्गातून बरं झाल्यानंतरही अनेकांना सतत थकवा, अशक्तपणा आणि ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं. अनेकदा ताप उतरल्यामुळे आपण पूर्णपणे बरे झालो आहोत असं वाटतं, पण शरीराची अंतर्गत दुरुस्ती प्रक्रिया अजून सुरू असते.

post dengue weakness | saam tv

पोस्ट-व्हायरल फटीग

पोस्ट-व्हायरल फटीग म्हणजे व्हायरल संसर्गाची मुख्य लक्षणं कमी झाल्यानंतरही कायम राहणारा थकवा होय. ताप, खोकला किंवा अंगदुखी संपली असली तरी व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो.

flu recovery symptoms | saam tv

सावरण्यास वेळ लागतो

व्हायरल संसर्गानंतर रोगप्रतिकारक शक्ती काही काळ एक्टिव्ह राहते. शरीरातील ऊतींची दुरुस्ती, ऊर्जा साठा आणि सूज कमी करण्याचं काम सुरू असतं. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो.

chronic fatigue symptoms | saam tv

मानसिक आरोग्यावरही परिणाम

पोस्ट-व्हायरल फटीगचा परिणाम शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर होऊ शकतो. अनेकांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण, विचारांमध्ये गोंधळ, झोपेच्या समस्या आणि स्मरणशक्ती कमी झाल्यासारखे वाटतं.

low energy after illness | saam tv

कोणती लक्षणे गंभीर मानली जातात?

काही महिन्यांपर्यंत थकवा कायम राहिला तर ते अधिक गंभीर स्थितीचं लक्षण असू शकतं. अशक्तपणा, चक्कर येणं, धडधड वाढणं, श्वास घेण्यास त्रास आणि झोपेच्या समस्या याकडे दुर्लक्ष करू नये.

immune system recovery | saam tv

डिस्क्लेमर

ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Kidney Health | saam tv

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

saam tv
येथे क्लिक करा