Gold Rate Today Saam Tv
महाराष्ट्र

Todays Gold Rate : सोनं ₹१५०० नी घसरले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Gold rate today in Maharashtra : जळगाव सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून प्रति तोळा तब्बल 1500 रुपयांची घट नोंदवली गेली आहे. चांदीच्या दरातही दोन हजार रुपयांची घसरण झाली.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Gold Price Drop ₹1500 Per Tola in Jalgaon Market : अमेरिका इजरायल आणि इराण यांच्या मधील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रूपयांची किंमत घसरत चालली आहे. असे असताना सोन्याचे दर वाढतील असा अंदाज वर्तवला जात होता. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याच पाहायला मिळाले. जळगावातील सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति तोळा १५०० रूपयांच्या आसपास घसरण नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर कोसळल्याचे पाहायला मिळाले. त्याशिवाय चांदीच्या तरातही दोन हजारांची कपात नोंदवण्यात आली आहे. जळगावातील सराफा बाजारात नेमकी किंमत किती आहे? पाहूयात.

मागील दोन दिवसांच्या तुलनेत सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी खरेदीदारांना मोठा फायदा झालाय. अमेरिका इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. पण आठवड्यात सोन्याच्या दराला पुन्हा एकदा उतरती कळा लागल्याचे दिसतेय. शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर १६१००० वरून १५९५०० रूपयांवर आले आहे.

शनिवार-रविवार बाजारपेठ बंद झाल्यानंतर आता सोमवारी काय होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मागील दोन दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात पंधराशे रूपयांची घसरण झाली आहे. जीएसटीशिवाय सोन्याचे दर १६१००० वरून १५९५०० वर खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात ही दोन दिवसात दोन हजार रूपयांची घसरण होऊन चांदीचे दर जीएसटी २६८००० हजार रूपयांवरून २६६००० वर खाली आले आहेत. युद्धजन्य परिस्थिती असल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा क्रूड तेलामध्ये गुंतवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सोने चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं सोने व्यावसायिक सांगत आहेत.

गॅस वापरावर निर्बंध -

इराण-इस्त्राइल महायुद्धाचा परिणाम भारतामदील सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस वापरावरती आता निर्बंध आलेत. सर्वसामान्यांना मिळणारा गॅस आता 21 दिवसांवरून 30 दिवसांनी मिळणार आहे. KYC ही बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात या निर्बंधामुळे अनेक अडचणीत येत असून अनेक ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नसतं तर काही ठिकाणी ग्राहकांकडे मोबाईलच उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचं वितरक सांगत आहेत तर या निर्बंधामुळे आणि गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT