Today's Gold - Silver Price Saam TV
महाराष्ट्र

Gold Price Hike: सुवर्णनगरीत सोन्याने भाव खाल्ला, एका तोळ्यात १४०० रुपयांनी वाढ; वाचा आजचे दर किती?

Today's Gold - Silver Price: सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा मार्केटमध्ये सोनं-चांदीचे दर पुन्हा वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर कमी होत होते. पण आज सोन्याच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Priya More

संजय महाजन, जळगाव

सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण सोनं खरेदी करण्यासाठी आता त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा मार्केटमध्ये सोनं चार दिवसांनी १४०० रुपयांनी वाढून पुन्हा १ लाख रुपये तोळ्यावर पोहचले आहे. चांदीतही १००० रुपयांनी वाढ झाली आहे. ट्रम्प टेरिफची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

इस्त्रायल-इराण युद्ध बंदीच्या घोषणेनंतर १ लाखांच्या खाली घसरलेल्या सोन्यात दरात पुन्हा चांगलीच वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात १,४४२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चार दिवसांनी सोन्याचे दर लाखांवर म्हणजेच १,००,५२८ रुपयांवर गेले आहे. तर चांदीचे दर देखील वाढून ते १ हजारांपार गेले आहे. चांदिचे आजचे दर १,१०,२१० रुपये किलो इतके झाले आहे. या दरवाढीमागे ट्रम्प सरकारने टेरिफ धोरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचे कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

तर, सोनं १३३९ नी स्वस्त होऊन ९९,०८६ रुपयांवर आले आहे. त्यानंतर ३० जूनपर्यंत ९९,०८६ च्या दरावर स्थिरावले होते. १ जुलै रोजी म्हणजे बुधवारी १,४४२ रुपयांनी वाढ होऊन ते १,००,५२८ रुपयांवर गेले आहे. तसेच २७ जूनपासून १,०९,१८० रुपये असलेली चांदी १ जुलैला १,१०,२१० रुपये किलोवर पोहोचली.

सोनं-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीमागे टेरिफबद्दल पुन्हा चर्चा सुरू केल्याचे प्रमुख कारण आहे. सध्याचे दर हे खरेदीसाठी चांगले असल्याचे सोने बाजाराचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: पुण्यातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

School Holiday: शाळा-कॉलेज उद्याही बंद राहणार, कुठे-कुठे घेण्यात आला सुट्टीचा निर्णय? वाचा सविस्तर

Chanakya Niti : नवरा बायकोत 'ही' गोष्ट नसेल तर तुटेल नातं

Mumbai Tourism : पावसाळ्यात जोडीदारासोबत जा रोमँटिक लाँग ड्राईव्हवर, मुंबईतील ५ बेस्ट लोकेशन

Shocking News : आईने दोन पेग घेतले त्यानंतर..., हत्या करून निळ्या ड्रममध्ये मृतदेह लपवला, चिमुकल्यानं सांगितलं वडिलांसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT