कोल्हापुरच्या आखाड्यात गोकुळ दूध संघ निवडणुकीने राजकीय वातावरण ढवळून निघालंय. निवडणूक अगदी तोंडावर आली असताना गोकुळच्या खासगीकरणाचा मुद्दा अचानक चर्चेत आलाय. त्याला कारण ठरलंय रासपचे अध्यक्ष आणि माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी केलेला गौप्यस्फोट.....गोकुळच्या खासगीकरणाचा घाट घातला होता. त्यासाठी कोट्यवधींचं आमिष मंत्री असताना आपल्याला दाखवलं होतं, असा दावा जानकर यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना केलाय.
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकार घडल्याचा दावा जानकर यांनी केला आहे. जानकरांनी खासगीकरणाचा बाॅम्ब टाकताच काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. यावरुनच सतेज पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या गोकुळमधील हस्तक्षेपावर बोट ठेवलंय. त्याला राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ही ऑफर जानकरांना कोणी दिली, त्यामागे कोणाचा हात होता ? याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र यामुळे गोकुळच्या निवडणुकीत खासगीकरणाचा नवा मुद्दा मिळाला असून य़ावरून जोरदार राजकारण पेटण्याची शक्यता आहे. मात्र हा मुद्दा कुणाला भोवणार आणि कुणाला अडचणीचा ठरणार याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.