गोकुळबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला
गोकुळ दूध संघावर चार शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती केली जाणार आहे
गोकुळच्या चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मिळणार
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच कायम राहिल्याने गोकुळ दूध संघावर पुन्हा एकदा प्रशासकच कायम आहे. अशातच काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा झटका बसला. महायुतीने सतेज पाटील यांच्या बहुमताला धक्का दिला. गोकुळवर ४ शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती केली जाणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संचालकांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. त्यांना मतदानाचा देखील अधिकार मिळणार आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटला नाही. हा तिढा लवकरच सुटेल अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सतेज पाटील यांनी आक्रमक विधान केले. जे काही कायदेशीर मार्ग आहेत ते सर्व मी अवलंबणार आहे. मी गप्प बसणार नाही. साडेपाच लाख शेतकऱ्यांनी हा कौल दिलेला आहे. लोकांचा जनाधार नाकारत असाल तर रस्त्यावर उतरायची तयारी ठेवलेली आहे. पूर्ण बहुमत असून सुद्धा केवळ कोरम पूर्ण करण्यासाठी दोन संचालकांचा पाठिंबा मागत आहेत हे महायुतीचे हस्त्यास्पद विधान आहे. तसे असेल तर आमचे महानगरपालिकेत पाच नगरसेवक कमी आहेत, महायुतीने आम्हाला पाठिंबा द्यावा आणि महापौर आमचा करावा असा सतेज पाटलांनी खोचक टोला लगावला.
सतेज पाटील यांनी पुढे सांगितले की, 'जर विरोधी पक्षात राहण्याचा मतदारांनी आपल्याला कौल दिलाय तर तो तुम्ही स्वीकारला पाहिजे. माझ्या पत्रकाला काहीतरी उत्तर द्यावा म्हणून त्यांनी हे काढले आहे. या पत्रकावर सह्या कोणी करायच्या यावरून सुद्धा महायुतीत वाद झालेला आहे. चार संचालक वाढवून त्यांना मतांचा अधिकार देण्याबाबत कॅबिनेटमध्ये काय निर्णय होणार त्यावर मी उद्या प्रतिक्रिया देणार आहे. सत्तेचे सूत्र असेच राहणार नाही ते सुद्धा २०२९ ला बदलणार आहे त्यावेळी सुद्धा आम्ही सगळं लक्षात ठेऊ.'
'एक मताची किंमत आहे वाजपेयी सुद्धा त्यावेळी पंतप्रधान निवडनुकीत एकमताने पडले होते त्यामुळे हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्हाला खात्री आहे की महायुतीचे सर्व संचालक १० तारखेच्या सभेमध्ये उपस्थित राहतील आणि आमचे शशिकांत पाटील चुयेकर चेअरमन होतील. महायुतीतील हा खेळखंडोबा नेमका कोणासाठी सुरू आहे.', असा सवाल सतेज पाटील यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.