Bhagat Singh Koshyari  Saam tv
महाराष्ट्र

"शिवाजी महाराजांचा काळ जुना झाला..." राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यामुळे वातावरण पुन्हा तापणार?

या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात आलं.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है असे वक्तव्य राज्यपाल डॉ. भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभामध्ये ते बोलत होते.

या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात आलं. पवार आणि गडकरी हे दोघेही व्हिजनरी आहेत. पीएचडी आणि डी. लिट पेक्षाही या नेत्याचं काम मोठं आहे अशा शब्दात राज्यपालांनी या दोघांच्या कार्याचा गौरव केला. (Latest Marathi News)

महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं. त्यात त्यांनी समर्थ रामदासांविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं, असं म्हटलं होत. त्यावेळी देखील वाद उफाळला होता.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य

भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, सावित्री बाईंचं लग्न दहाव्या वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा ही लहान मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी गिफ्टसाठी हट्ट, मालकाकडून शिवीगाळ करत अमानुष मारहाण, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ

IRCTC New Rule: आता रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही; IRCTC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT