Goa Solapur Flight Saam Tv
महाराष्ट्र

Goa - Solapur Flight Cancel : गोवा-सोलापूर विमान अचानक रद्द; प्रवाशांमध्ये संतापाची लाट

Goa - Solapur Flight : गोव्याहून सोलापूरकडे येणारी विमानसेवा तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आली. सुमारे ६० प्रवासी अडचणीत आले असून नाराजी व्यक्त करत आहेत. नव्याने सुरू झालेल्या या सेवेला मिळालेल्या प्रतिसादावर यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

सोलापूर विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच गोव्याहून सोलापूरकडे येणारी फ्लाइट तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गोव्यातून सोलापूरकडे येणाऱ्या या विमानात अंदाजे ५५ ते ६० प्रवासी प्रवास करत होते. विमान अचानक रद्द झाल्याने अनेक प्रवाशांचे नियोजन बिघडले.काहीजण पावसाळ्यात गोव्यात सहलीला गेले होते. ही विमानसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांच्या आनंदावर विरझन पडले आहे.

विमानतळ प्राधिकरण अधिकारी अंजली शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही उड्डाण सेवा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली असून, सर्व प्रवाशांना शंभर टक्के तिकीटाचे पैसे परत केले जातील असे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, सोलापूर-गोवा ही विमानसेवा सुरू होऊन अवघा एक महिना होत असताना आतापर्यंत १३०० हून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे अशा अचानक रद्दीमुळे विमान सेवेबाबतचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.अहमदाबाद घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

Fansachi Rassa Bhaji Recipe : कोकणात बनवतात तशी फणसाची झणझणीत रस्सा भाजी, चाखाल अस्सल गावरान चव

SCROLL FOR NEXT