विमानाच्या लँडिंगला आणि टेक ऑफ करण्यासाठी वातावरणामुळे उशीर होणे अशी कारण आपण नेहमीच ऐकतो. मात्र पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर आलेल्या श्वानामुळे भुवनेश्वरहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला ५७ मिनिट उशिराने लँडिंग करावी लागली.ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे धावपट्टीवर येणाऱ्या भटक्या प्राण्यांचा आणि उड्डाण मार्गावर अडथळा निर्माण होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाने २८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता भुवनेश्वरहून उड्डाण केले आणि सायंकाळी ६.१५ वाजता पुण्यात उतरणार होते. मात्र, विमान उतरण्याच्या तयारीत असताना वैमानिकांना विमान सुमारे १०० ते १५० फूट उंचीवर असताना धावपट्टीवर एक कुत्रा दिसला. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने तातडीने विमान उतरवण्याची प्रक्रिया थांबवली. धावपट्टी मोकळी होईपर्यंत विमान आकाशातच ठेवण्याची सूचना पायलटला देण्यात आली होती. ग्राउंड स्टाफने कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यानंतर विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. अखेर, विमान सुरक्षितपणे उतरले, जरी वेळापत्रकापेक्षा जवळजवळ एक तास उशिरा विमान उतरले असले तरी प्रवासी सुखरूप होते.
विमानाच्या उशीरा लँडिंगमुळे बरीच गैरसोय झाली असली तरी, प्रवाशांना अखेर सुरक्षितपणे उतरवण्यात यश आले. विमान कंपनीने अद्याप या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
अशीच घटना १३ फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर घडली होती. पुणे विमानतळावर धावपट्टीवर विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवर आलेला कुत्रा विमानाला धडकून त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे विमानाचे उड्डाण थांबवावे लागले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.