कोरोनाने मेलेल्या मित्राच्या प्रतिक्षेत आजही 'ती' बसते रुग्णालयाच्या दारात Saam Tv
महाराष्ट्र

कोरोनाने मेलेल्या मित्राच्या प्रतिक्षेत आजही 'ती' बसते रुग्णालयाच्या दारात

एक मैत्रीण कोरोनाने तिच्या मित्राचा मृत्यू झाला हे मानायला तयार नाही. त्याच्या मृत्यूनंतरही तो मला त्याच ठिकाणी भेटेल, असे समजून ती मागील दोन महिन्यांपासून औरंगाबाद शहरातील सिग्मा हॉस्पिटलच्या दारात जाऊन बसते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद - एक मैत्रीण कोरोनाने Corona तिच्या मित्राचा मृत्यू झाला हे मानायला तयार नाही. त्याच्या मृत्यूनंतरही Death तो मला त्याच ठिकाणी भेटेल, असे समजून ती मागील दोन महिन्यांपासून औरंगाबाद शहरातील सिग्मा हॉस्पिटलच्या Hospital दारात जाऊन बसते. अगदी पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत तेथेच बसून राहते. त्यानंतर घरी जाते. या प्रकारामुळे तिची आई चिंताग्रस्त झाली आहे. हा संपूर्ण प्रकार दामिनी Damini पथकाला समजल्यानंतर त्यांनी मुलीची भेट घेत तिचे समुपदेशन केले. तिला नेमकी परिस्थिती समजावून सांगितली. girl is still waiting for her friend who is dead due to corona

गेल्या सव्वा वर्षात कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना गमावले आहे. त्यामुळे अनेकांना जगणंही कठीण झालं आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. कोरोनाने आपला मित्र हिरावला यावर एका मैत्रिणीचा विश्वासच बसत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून ती रोज रुग्णालयासमोर जाऊन बसते आणि आपला मित्र कोरोनातून बरा होऊन भेटायला येईल याची वाट पाहते.

हे देखील पहा -

औरंगाबाद शहरातील नंदनवन कॉलनीतील एक 24 वर्षीय तरुणी रात्र-रात्र बाहेर राहत होती, पहाटे दोन ते तीन वाजता घरी जात असल्याने कुटुंबीय नेमके काय झाले याचाच विचार करत होते. ती कुटुंबीयांनाही काही बोलत नव्हती. सतत तणावात राहते, अशी माहिती १७ जून रोजी औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांच्या दामिनी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस नाईक निर्मला निंभोरे यांच्या पथकाने घरी जाऊन त्या तरुणीच्या आईची भेट घेतली. girl is still waiting for her friend who is dead due to corona

मुलगी काही दिवसांपासून प्रचंड तणावात राहू लागली आहे. हल्‍ली ती तर सतत घराबाहेरच राहात असून पहाटे दोन ते तीन वाजता घरी येते. कारण विचारले तरी काहीही बोलत नाही. तिला नेमके काय झाले आहे हे समजायला मार्ग नाही. तिची आम्हाला खूप चिंता वाटू लागली आहे असे सांगितले.

पोलिसांनी तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. सुरुवातीला तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती हळूहळू सांगू लागली, तिचा एक मित्र होता. तो बीएससीचे शिक्षण घेत होता.

काही दिवसांपूर्वी सिग्मा हॉस्पिटलमध्ये कोरोनाने त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून मी खूप तणावात आहे. जवळचा मित्र गेल्याने कोणत्याच कामात माझे मन लागत नाही असे तिने सांगितले. माझी मानसिक स्थिती ठिक राहिली नाही. तो सिग्मा हॉस्पिटलच्या दारात मला भेटेल असे मला नेहमी वाटत असल्याचे. त्यामुळे मी मागील काही दिवसांपासून सारखी हॉस्पिटलच्या दारात जाऊन बसते. तिच्याच तोंडून नेमका प्रकार समजल्यानंतर निर्मला निंभोरे यांनी तिला सर्व हकिकत समजावून सांगितली. girl is still waiting for her friend who is dead due to corona

वडिलांचे निधन झाल्याने आता आईकडे लक्ष द्यायलाही तुझ्याशिवाय कोणी नाही याचीही तिला जाणिव करून दिली. आयुष्यात ज्यांचे आपलयवर आणि आपले एखाद्यावर निखळ प्रेम असल्यामुळे मानसिक आणि भावनिक आधार असतो. जर तो व्यक्ती अचानक सोडून गेला तर ,मानसिक धक्का बसल्याशिवाय राहत नाही. कोरोनाने एका मैत्रिणीचा मित्र घेऊन गेला पण त्यांचं प्रेम तिच्यावर त्यांनी कायम ठेवलं.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT