भूषण अहिरे
धुळे - वट सावित्री पौर्णिमा Vatpornima म्हणलं की हा फक्त महिलांचा सण असे पुरुषांच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते परंतु धुळ्यातील एका पुरुषाने चक्क आपल्या आजारी पत्नीसाठी वडाची पूजा करून उपवास पकडला आहे. For sick wifes wellness husband did vat purnima rituals
धुळ्यातील Dhule अशोक येवले यांच्या पत्नी गेल्या कित्येक वर्षांपासून विविध आजाराने पीडित आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे घरातील सर्व काम त्यांचे पती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नित्यनियमाने करीत आहेत. धुणे, भांडी पासून स्वयंपाक त्याचबरोबर घरातील सर्व कामांसह पत्नीची देखील देखभाल ते मनापासून करतात. पत्नीला वेळेवर जेवण,चहा, नाश्ता यासह पत्नीच्या गोळ्या औषधांची देखील काळजी तेच घेतात.
हे देखील पहा -
घरातील कामासह पत्नीची देखभाल त्याचबरोबर अशोक येवले यांचे किराणा दुकान देखील आहे. एवढी सर्व कामांची जबाबदारी अशोक येवले यांच्या वरती असताना कुठल्याही प्रकारचा कचरा न करता सर्व कामे ते रोजच्या रोज नित्यनियमाप्रमाणे करत असतात. For sick wifes wellness husband did vat purnima rituals
आजच्या युगामध्ये देखील अशा पद्धतीने पत्नीवर जिवापाड प्रेम करणारे पती मिळाल्यामुळे अशोक येवले यांची पत्नी स्वतःला खरच सौभाग्यवती समजते.
पत्नीची मनापासून देखभाल करणाऱ्या अशोक येवले यांचे कौतुक संपूर्ण परिसरामधील नागरिकांना वाटत असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अशोक येवले हे आपल्या पत्नीसाठी दिवसभर राबत असतात.
अशोक येवले यांच्या लग्नाला 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. येवले यांना एक मुलगा देखील आहे परंतु कामानिमित्त तो बाहेरगावी असल्याने घरामध्ये फक्त अशोक येवले आणि त्यांची पत्नी हे दोघेच असतात. त्यामुळे आजारी पत्नीची संपूर्ण जबाबदारी पती अशोक येवले यांच्या खांद्यावर असल्यामुळे ही जबाबदारी अशोक येवले हे चोखपणे पार पाडताना दिसत आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.