हो झाडंही घेतात टेन्शन

मानवांना त्यांच्या ताणतणावाची लक्षणे सहसा समजत नाहीत.
हो झाडंही घेतात टेन्शन
हो झाडंही घेतात टेन्शनGoogle
Published On

झाडे सजीव Animate असतात, झाडे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आता पर्यंत झाडे ऑक्सीजन Oxygen देतात आणि कार्बन डायऑक्सइड Carbon dioxide सोडतात, हे आपण लहानपणापासून आपल्याला माहिती होते. मात्र झाडांनाही तणाव येतो, याबाबत आपण कधी एकले आहे का, मात्र हे खरं आहे. नुकत्याच झालेल्या एक संशोधनातून हा खुलासा झाला आहे. इस्रायलमधील Israel जेरूसलेमच्या Jerusalem हिब्रू विद्यापीठाच्या Hebrew University संशोधकांनी यावर संशोधन केले आहे.

आजवर झाडांना कसे वाटते हे त्यांच्या हावभावावरून समजणे कठीण होते. परिणामी झाडांमध्ये होणाऱ्या अनेक बदलांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती. मात्र इस्त्रायली संशोधकांनी बटाट्याच्या झाडांमध्ये काही महत्त्वाच्या बदलांचे निरीक्षण केले. झाडे ताणतणावात असताना प्रकाश सोडतात, असे या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे आता वनस्पतींची गरज अधिक चांगल्या प्रकारे समजली जाण्यास मदत होणार असल्याचे मतही संशोधकांनी व्यक्त केले आहे.

- झाडे ताणतणावाखाली कधी असतात?

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार झाडांनाही तणाव येत असतो आणि त्याचा परिणामही त्यांच्यावर दिसून येतो. जेव्हा झाडांमध्ये पाण्याची कमतरता असते, खूप थंडी असते, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास किंवा तीव्र सूर्यप्रकाशमुळेही झाडे तणावात येतात. मानवांना त्यांच्या ताणतणावाची लक्षणे सहसा समजत नाहीत. म्हणूनच, अशा परिस्थितींचा सतत सामना करून झाडे मरून जातात.

हो झाडंही घेतात टेन्शन
31 जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करावेत

- झाडांमधील तणाव समजण्यासाठी केले बदल

झाडांमधील तणाव समजून घेण्यासाठी अनुवंशिकरित्या बटाट्याच्या रोपांमध्ये काही सुधारित बदल केले. वनस्पतीच्या क्लोरोप्लास्टमध्ये एक नवीन जीन घातला. जेव्हा वनस्पती ताणतणावाखाली असते तेव्हा नवीन जीन त्यात विशिष्ट प्रथिनांचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे तणाव कमी होतो. जेव्हा या प्रोटीनचे प्रमाण वाढते, तेव्हा बटाट्याचे रोप प्रकाश परावर्तित करते. यावरून हे लक्षात येते की, झाडे तणावाखाली आहेत. या संशोधनादरम्यान, वैज्ञानिकांनी काही रोपे कॅमेर्‍याशी कनेक्ट केली होती. जेव्हा जेव्हा वनस्पतीला पाण्याची कमतरता, तीव्र सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागतो तेव्हा त्या रोपांमधून प्रकाश परावर्तित होतो.

- बटाट्यांवरच प्रयोग का?

इस्त्रायली शास्त्रज्ञांनी या प्रयोगासाठी बटाटा निवडण्याचे कारण म्हणजे, बटाटा इस्रायलचे मुख्य पीक आहे. इस्रायल जगभरात बटाट्यांच्या वार्षिक पिकाच्या सुमारे 40 टक्के निर्यात करतो. बायोसेन्सरच्या मदतीने बटाट्याचे पीक खराब होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते आणि लागवडीची व्याप्ती वाढवता येते. तसेच या वनस्पती हवामान बदलाशी लढा देण्यास सक्षम बनविल्या जाऊ शकतात. यास्तही झाडांवरील या प्रयोगासाठी बटाट्याच्या झाडाची निवड करण्यात आली आहे.

- वनस्पतींचा ताण कॅमेरामधूनच दिसू शकतो

संशोधक डॉ. शिलो म्हणतात, वनस्पतींचा रंग बदलण्याची प्रक्रिया डोळ्यांनी पाहिली जाऊ शकत नाही. वानस्पतींमधील ताणतणावामुळे होणारे हे बदल पाहण्यासाठी म्हणूनच हे एका खास प्रकारच्या कॅमेर्‍याशी कनेक्ट करण्यात आले आहेत. हे बदल पाहण्यासाठी बायोसेन्सरच्या मदतीने वनस्पतींचे सिग्नल समजले जाऊ शकतात. तसेच वनस्पतीवर उच्च तापमान, पाण्याची कमतरता आदि गोष्टींचा काय परिणाम होतो, हे पाहण्यासाठी देखील बायोसेन्सर मुळे समजू शकते.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com