लग्नानंतर मित्राने बोलणे बंद केले म्हणून जुन्या मैत्रिणीने केले 'असे' कृत्य !

 

लक्ष्मण सोळुंके

महाराष्ट्र

लग्नानंतर मित्राने बोलणे बंद केले म्हणून जुन्या मैत्रिणीने केले 'असे' कृत्य !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण सोळुंके

जालना : लग्नानंतर मित्राने बोलणे बंद केले म्हणून त्याच्या मैत्रिणीने आपल्या मित्राच्या पत्नीच्या नावाने बनावट इंस्ट्राग्राम Instagram अकाउंट तयार करून अश्लील मॅसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मैत्रीण सायबर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. Girl created fake account and message her married friend by the name of his wife

जालना Jalna जिल्ह्यातील घनसावंगी Ghansavangi तालुक्यातील एका तरुणीचा विवाह पाच महिन्यापूर्वी झाला होता. आपल्या पती सोबत सासरी राहत असलेल्या मुलीच्या नावानेच तिच्या पतीच्या मोबाईल वर इंस्ट्राग्रामच्या माध्यमातून वारंवार वेगवेगळे अकाउंट तयार करून अश्लील मॅसेज येत आहेत, अशी ही भुवया उंचावणारी धक्कादायक बाब समोर आली. या नंतर माहेरी आलेल्या या नवविवाहित तरुणीने अश्लील मॅसेज पाठवून कुणी तरी माझी बदनामी करत असल्याचा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.

हे देखील पहा-

त्या नंतर नवविवाहित तरुणीच्या वडिलांनी या बाबद घनसावंगी पोलिस ठाण्यात Police Station तक्रार नोंदविली. आपल्या जवायाच्या मोबाईल वर इंस्ट्राग्रामच्या माध्यमातून आपल्या मुलीच्या नावाने अश्लील मॅसेज पाठवत असल्याची तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घनसावंगी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत सदरचा गुन्हा सायबर पोलिस Cyber Police ठाणे जालना यांच्याकडे वर्ग केला.

सायबर पोलिसांनी ह्या बनावट इंस्ट्राग्राम अकाउंट ची माहिती घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान माहिती मिळाली की, हे अकाउंट एका मुलीने तयार केले आहे. ती हे बनवत इंस्टाग्राम अकाउंट ऑपरेट करत आहे. अधिक तपास केला असता ती मुलगी पोलिसांना सापडली आणि पोलिसांनी या अकाउंट बाबद त्या मुलीला विश्वासात घेऊन विचार पूस केली. विचारपूस केल्यानंतर कळले कि हि मुलगी तक्रारदार यांच्या जावयाची जुनी मैत्रीणच आहे. हे अश्लील सदरचे मेसेज आपणच करत असल्याची कबुली या मुलीने दिली.

फिर्यादीच्या जावई म्हणजेच मित्राने लग्नानंतर आपल्याशी बोलणे बंद केल्याने त्यांचा राग मनात धरून आपण बनावट इंस्ट्राग्राम अकाऊंट तयार करून अश्लील मॅसेज पाठवल्याचे कृत्य केले. अशी कबुली दिल्या नंतर सायबर पोलिसांनी या मुलीविरुद्ध कायदेशीर कारवाई करत तिला मा न्यायालय Court घनसावंगी यांच्या समोर सादर केले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT