विहिरीत सापडलेला मुलीचा मृतदेह वडिलांनीच पुरला; Honor Killingचा संशय Saam Tv
महाराष्ट्र

विहिरीत सापडलेला मुलीचा मृतदेह वडिलांनीच पुरला; Honor Killingचा संशय

औरंगाबाद मध्ये एक घरात किरकोळ वाद झाल्यानंतर एक सतरा वर्षीय मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली आणि काही तासांनी ती विहिरीत पडलेली आढळून आली

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद मध्ये एक घरात किरकोळ वाद झाल्यानंतर एक सतरा वर्षीय मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली आणि काही तासांनी ती विहिरीत पडलेली आढळून आली. तर वडिलांनी तिच्या भावाच्या व इतर दोघांच्या मदतीने तिला बाहेर काढले. वडिलांनी घरातील इतर सदस्यांना एका खोलीत बंद करून मुलीचा मृतदेह विहिरीजवळ पुरून टाकला. घटनेच्या चार दिवसानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली. दरम्यान, गुरुवारी मुलीचा मृतदेह पुन्हा काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे.

राधा जारवाल असे मुलीचे नाव आहे आणि हा ऑनर किलिंग असल्याची चर्चा होती. 22 सप्टेंबर रोजी दुपारी पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांना एका व्यक्तीने फोन केला. त्यांनी पोलिसांना गावातील सतरा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती दिली.

हे देखील पहा-

सर्वच प्रश्न अनुत्तरित;

या संपूर्ण घटनेत मुलगी बेपत्ता झाली हे समोर आल खरं मात्र, तिचे काय झाले, तिने का आत्महत्या केली याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. प्राथमिक चाैकशीत ती ज्या विहिरीत सापडली त्याच विहिरीच्या शेजारी कुठलीही विचारपूस किंवा माहिती न मिळवता, मृतदेह बाहेर काढला आणि थेट मृतदेह पुरला असा दाट संशय पोलिसांना आला आहे. मुलीने आत्महत्या केली तर तिला विहिरीतून काढल्यानंतर इतर नातेवाईक तेथून कसाकाय निघून जाऊ शकतात? ते का गेले? मुलीला काही वेळ घरासमोर पलंगावर ठेवले. तर मुलीच्या वडिलांनी घरातील सदस्यांना आतच थांबवल आणि तिला एकट्याने नेऊन शेतात परस्पर का पुरले, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

घरात काय झालं होत ?

राधाच्या दोन लहान बहिणी व भावांनी पोलिसांना घटनाक्रम सांगत असताना त्यांनी माहिती दिली की, रात्री राधा संध्याकाळी स्वयंपाक करत असताना त्यांच्या वडिलांनी राधाला मारले. त्यामुळे ती घराबाहेर गेली. तर घराबाहेर राधा दिसत नसल्याने त्यांच्या वडिलांनी राधा चा शोध सुरू केला. शोधत असताना शेतातील विहिरीत तिचा मृतदेह सापडला. तो बाहेर काढला. ती मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी परस्पर ठरवले. आणि इतर नातेवाईक सरळ निघून गेले. राधाला खाटेवर ठेवल आणि त्यांना आणि त्यांच्या आईला घरातच थांबवले. त्यानंतर वडिलांनी त्याच्या बहिणीला विहिरीजवळ पुरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT