मुलांच्या शिक्षणासाठी मुख्याध्यापकांचा अनोखा उपक्रम... ओंकार कदम
महाराष्ट्र

मुलांच्या शिक्षणासाठी मुख्याध्यापकांचा अनोखा उपक्रम...

सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यामधील वडगाव येथील लक्ष्मण खरात या जिल्हापरिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी या सगळ्या गोष्टींना फाटा देत कोरोनाच्या काळात मुलांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये, म्हणून "घरोघरी शाळा" हा उपक्रम सुरू केला आहे.

ओंकार कदम

ओंकार कदम

सातारा : शासनाच्या शाळा आणि त्याही ग्रामीण भागात म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन अगदी वाईट असतो. परंतु सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यामधील वडगाव येथील लक्ष्मण खरात या जिल्हापरिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी या सगळ्या गोष्टींना फाटा देत कोरोनाच्या काळात मुलांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये, म्हणून "घरोघरी शाळा" हा उपक्रम सुरू केला आहे.     

हे देखील पहा-

कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र शाळा बंद आहेत. सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. परंतु, ऑनलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचत नव्हते. अनेक पालकांकडे मोबाईल नव्हते. मोबाईल आहे, पण रेंज नाही, रेंज आहे पण, बॅलन्स नाही अशी परिस्थिती सर्वत्र होती. म्हणून शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी तसेच ऑनलाईन शिक्षणात होणाऱ्या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांच्या आरोग्यावर भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गेल्या शैक्षणिक वर्षापासून (जुलै २०२०) पासून  "घरोघरी शाळा" हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवले आहे. लक्ष्मण खरात यांनी विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवले आहे. पहिलीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण हसत- खेळत सुरू राहण्यासाठी खरात सरांनी काही म्हत्वाच्या गोष्टी सुरू केले आहेत.-

-प्रत्येक घटकावर आधारित शैक्षणिक साहित्याचा संच प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे देण्यात आले.

-सदरचा शैक्षणिक साहित्याचा संच स्वखर्चाने दिले.

-प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी नियमित गृहभेटी देवून, शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला वैयक्तीक अध्यापन करण्यात आले.

-विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या आधारे, विद्यार्थ्यांचा अभ्यास हसत- खेळत कसा घ्यावा याचे मार्गदर्शन पालकांना करण्यात आले.

-विद्यार्थी ज्याठिकाणी जाईल, त्याठिकाणी त्याचा अभ्यास हसत- खेळत व आनंदाने होण्यासाठी घर आणि परिसरात शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यात आली.

-विद्यार्थ्यांची नेहमीची घेण्याची जागा ,विद्यार्थ्याच्या अंगणातील फरशी, कोंबडीचे खुराडे, पाण्याची टाकी तसेच दिखावा घर परिसरातील उपलब्ध इतर गोष्टींचा कल्पकतेने वापर करून, विविध शैक्षणिक त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी अभ्यास हसत- खेळत सुरू राहिला.

-सापशिडी सारख्या मनोरंजनात्मक खेळातून शिक्षण होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या परिसरामध्ये मोठ्या आकारातील सापशिडी तयार करून देण्यात आली.

-प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरातील भिंतीला विविध शैक्षणिक तक्ते आकर्षक पद्धतीने लावून, विद्यार्थ्यांच्या घरातच स्वतंत्र शाळा निर्माण करण्यात आली. सदरची शाळा विद्यार्थ्याला आपली वाटावी, म्हणून विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव आणि विद्यार्थ्यांचा आकर्षक फोटो भिंतीवर लावण्यात आला. यामुळे विद्यार्थ्याचे घर हीच त्याची शाळा तयार झाली आहे.

-शैक्षणिक साहित्याचा माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबर खेळत- खेळत त्याचा कसा अभ्यास घ्यायचा याचे मार्गदर्शन पालकांना करण्यात आले आहे. विद्यार्थ्याला दिलेल्या शैक्षणिक साहित्याच्या आधारे पालकही विद्यार्थ्याचा सराव घेवू लागले आहेत. यामुळे विद्यार्थ्याचे शिक्षण हसत- खेळत सुरू राहिले पाहिजे. शिवाय घरामध्ये असणाऱ्या वयस्कर व्यक्तीही आता अभ्यासाचे धडे गिरवू लागले आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमास लागणारे सर्व साहित्य शिक्षकांनी स्वतः तयार केले आहे. तसेच घर परिसरात लिहिण्यात आलेली विविध अक्षरे, विविध तक्ते, पाढे ,सापशिडी, इत्यादी शिक्षकाने स्वतः तयार केली आहे. यामुळे आता या शिक्षकांचा आदर्श राज्यातील इतर शिक्षक ही घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करतील ही अपेक्षा आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT