MHADA  Saam TV
महाराष्ट्र

म्हाडाच्या जमिनी, अतिक्रमण, संभाव्य विकास आणि आरक्षणाची माहिती एका क्लिकवर

म्हाडाच्या जमिनींचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करणे शक्य होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) मुंबईसह संपूर्ण राज्यभरातील विभागीय मंडळांच्या अखत्यारीतील जमिनींची अद्ययावत संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण आणि मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाकडून जीआयएस (Geographical Information System) मॅपिंग व आरपीए (Robotic Process Automation) ही संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

या संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून म्हाडाला स्वमालकीच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेले अतिक्रमण, आरक्षण निहाय रिक्त भूखंडांची उपलब्धत, याबाबतची माहिती एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे या जमिनींचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करणे शक्य होणार आहे.

जीआयएस मॅपिंग व आरपीए या संगणकीय प्रणालींच्या सहाय्याने राज्यातील म्हाडाच्या जमिनीशी संबंधित विविध अभिलेखांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे म्हाडाच्या मुंबईसह राज्यातील विभागीय मंडळांच्या अखत्यारीतील जमिनींचे प्रचलित कायदे व नियमावलींच्या वापराबाबतचे नियोजन तसेच सदर भूखंडांवर आर्थिक व बांधकाम योग्य क्षमता याबाबत माहिती संकलित केली जाणार आहे. कामकाजाच्या विविध टप्प्यांवर या माहितीचा उपयोग करता येणार आहे.

या कामांसाठी RAH Infotech, CE Infosystem Ltd, Replete Business solutions Pvt. Ltd. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात कामे पूर्ण केली जाणार आहेत. तसेच या संपूर्ण कार्यप्रणालीवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याकरिता तसेच वेळोवेळी कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीवर प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी, मुंबई मंडळातील कार्यकारी अभियंता (शहर), कार्यकारी अभियंता (वांद्रे विभाग), वास्तुशास्त्रज्ञ व रचनाकार, भू व्यवस्थापक आदींचा समावेश असणार आहे.म्हाडा प्रशासनातर्फे सर्व शासकीय संस्था, म्हाडा विभागीय कार्यालये, गृहनिर्माण संस्था, वसाहती, चाळी इत्यादींनीं याकामी संबंधित एजन्सींना सहकार्य करावे आणि सर्वेक्षणाकरिता आवश्यक असलेली माहिती तात्काळ उपलब्ध करवून देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT