ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या जोडीदारासह चांगला वेळ घालवण्यासाठी गर्लफ्रेंड बायफ्रेंड अनेकदा हॉटेल्समध्ये जातात. परंतु काही लोकांच्या मते, हॉटेल्समध्ये थांबणे बेकायदेशीर मानले जाते.
काही हॉटेल्स त्यांच्या पॉलिसीच्या मते, लग्न न झालेल्या जोडप्यांना रुम देण्यास नकार देतात.
काही हॉटेल्स अविवाहित जोडप्यांना रुम देतात. परंतु लग्न न झालेल्या कपल्सने हॉटेल्समध्ये एकत्र राहणे बेकायदेशीर आहे का, जाणून घ्या.
भारतीय संविधानातील आर्टिकल २१ हे लग्न न झालेल्या जोडप्यांना प्रोटेक्शन देते.
जर दोघांचे वय १८ वर्ष पूर्ण असेल तर ते कोणत्याही हॉटेल्समध्ये राहू शकतात.
हॉटेल्समध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड किंवा कोणतेही वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
जर सगळ्या गोष्टी कायदेशीर असतील तर पोलिसही हस्तक्षेप करु शकत नाही.