How Gen Z voters are changing Indian elections saam tv
महाराष्ट्र

युवा मतदार बदलणार निवडणुकांचं समीकरण; निवडणुकांची दोरी 'Gen Z'च्या हाती

Gen Z's Growing Influence: गेल्या काही दिवसांत दिल्लीच्या जंतरमंतरवर जे घडलं, त्यानं संपूर्ण देशाचं राजकारण हादरवून सोडलंय. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घेण्यापुरता मर्यादित असलेला लढा नाहीये, तर भारतीय राजकारणातील एका नव्या पर्वाची नांदी ठरू शकते. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट.

Suprim Maskar

  • युवा मतदार बदलत आहेत निवडणुकांचे समीकरण

  • भारतीय राजकारणात जनरेशन झेडची वाढती ताकद

  • आगामी निवडणुकांमध्ये युवा मतदारांची भूमिका

दिल्लीतील जंतरमंतरवर घडलेला इतिहास केवळ एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्याने भारतीय राजकारणात एका नव्या क्रांतीची नांदी झालीय. 'Gen Z' आणि युवा मतदारांनी दाखवून दिलेल्या ताकदीमुळे अनेकांचे डोळे उघडलेत. ज्या तरुणाईला राजकीयदृष्ट्या उदासीन मानले जात होते, त्याच तरुणाईनं आता निवडणुकीच्या गणितांना थेट आव्हान दिलं. 2029 ची विधानसभा असो की लोकसभा या दोन्ही निवडणुकांवर विद्यार्थी आंदोलनाचा प्रभाव पडणार असल्याची चिन्हे आहेत. ती कशी पाहूयात.

युवा मतदार बदलणार निवडणुकांचं समीकरण

जात, धर्म आणि मोफत योजनांपेक्षा 'रोजगार, शिक्षण आणि पारदर्शक परीक्षा' हेच निवडणुकांचे प्रमुख मुद्दे बनणार

18 ते 25 वयोगटातील 'Gen Z' मतदार कोणत्याही एका पक्षाचा बांधील व्होटबँक राहणारा नाही, कामगिरीच्या आधारावरच GEN Z मतदान करणार

सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तासांत लाखो तरुणांना एकत्र आणून मतदानाची दिशा बदलण्याची क्षमता तरुणाईत आहे. दरम्यान दिल्लीतील या आंदोलनाची धग येत्या काळात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 21.19 टक्के तरुण मतदार आहेत. तर गोवा राज्यात या सहा राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे 19.60 टक्के तरुण मतदार नोंदवले गेले आहेत. पंजाबमध्ये 21.44 टक्के तर गुजरातमध्ये सर्वाधिक 23.32 टक्के तरुण मतदार असून त्यांची मतं महत्त्वाची ठरणार आहेत. दरम्यान 2029च्या लोकसभा निवडणुकीत 'Gen Z' आणि 'Alpha' पिढीची मतं निर्णायक भूमिकेत असतील.सुमारे 10 ते 12 कोटी नवीन तरुण मतदार पहिल्यांदाच किंवा दुसऱ्यांदा खासदार निवडण्यासाठी मतदान करतील.

त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीचा जाहीरनामा तयार करताना तरुणाईच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे अशक्य होईल. आता जंतरमंतरवरील आंदोलनानं सर्वच राजकीय पक्षांना धोक्याची घंटा वाजवून दिलीये. तरुणांचा हा असंतोष जर निवडणुकीत मतपेटीद्वारे बाहेर पडला, तर 2029 च्या निवडणुकीत भल्याभल्या राजकीय पक्षांचा विजयाचे गणित बिघडू शकते. दिल्लीतून पेटलेली ही संघर्षाची ठिणगी देशाच्या राजकारणाची नवी दिशा ठरवेल, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रक्षकच बनला भक्षक, पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Monday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार, वाचा आजचे राशीभविष्य

मुंबईत होतोय देशाचा पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार, प्रकल्पाचे वैशिष्ट्ये काय?

Ladki Bahin Yojana: 1500 रुपयांचं काय करायचं? आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना सांगितली पैशांच्या बचतीची आयडिया

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दणका; शेकडो घरांचे नुकसान, 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT