Syndrome Cause  Economics Times
महाराष्ट्र

GBS Syndrome: पुण्यात रुग्णांची संख्या स्थिरावली; GBS सिंड्रोम राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये शिरला, संकट कायम

GBS Syndrome Outbreak : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयासह अनेक रुग्णालयात जीबीएस सिंड्रोम आजाराच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यासह इतर जिल्ह्यातही या आजाराने शिरकाव केलाय.

Bharat Jadhav

GBS सिंड्रोम आजाराने पुण्यात थैमान घातलंय. पुण्यात या आजाराचे १११ रुग्ण झाले आहेत. आज रात्रीपर्यंत नवीन रुग्णाची कोणतीच नोंद झालेली नाहीये. मात्र पुण्यानंतर आजार इतर जिल्ह्यांमध्ये शिरलाय. पुण्यातनंतर आता या आजाराने नागपूर, सोलापूर, कोल्हापुरातही शिरकाव केला आहे. एका बाजूला रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासन सतर्क झालंय. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही जीबीएस सिंड्रोममुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. तसेच आज ९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रोज या आजाराच्या रुग्णांची नोंद होत होती. आज मात्र नवीन कोणत्याच रुग्णाची नोंद झालेली नाहीये. दिवसभरातून एक ही रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिलीय. दरम्यान जीबीएसवर ठोस अशी उपचारपध्दती नसली तरी प्रचलित उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलंय.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं असल्याचंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कुठे-कुठे आहेत रुग्ण

पुणे

111 रुग्ण

नागपूर

6 रुग्ण

कोल्हापूर

2 रुग्ण

सोलापूर

2 संशयित रुग्ण

तर एका संशयिताचा मृत्यू

दरम्यान जीबीएस सिंड्रोम आजार का पसरतोय याचं कारण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचेही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) अभ्यासातून समोर आलेले आहे. ‘जीबीएस’ रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील विहीर व अन्य ठिकाणची पाहणी केली.

सीडीसी म्हणजेच रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, ही एक दुर्मिळ स्थिती असते. हा आजार झाल्यानंतर मज्जातंतूंना नुकसान होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती स्वताःच्याच नसांना नुकसान करू लागते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जीबीएसची प्रत्येक वयाच्या लोकांना होत असल्याचं सांगितलंय.

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होता आजार

० ते ०९ :- १९ रुग्ण

१० ते १९ :- १५ रुग्ण

२० ते २९ :- २० रुग्ण

३० ते ३९ :- १३ रुग्ण

४० ते ४९ :- १२ रुग्ण

५० ते ५९ :- १३ रुग्ण

६० ते ६९ :- ०८ रुग्ण

७० वर्षांवरील ०१ रुग्ण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT