GBS News Update : जीबीएस आजारामुळे नागपूरमध्ये ४५ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झालाय. पुणे, मुंबईनंतर जीबीएसने नागपूरातही थैमान घातलेय. जीबीएसमुळे (Guillain-Barré Syndrome) मृत्यू झालेल्या राज्यातील एकूण रूग्णाची संख्या आता ९ वर पोहचली आहे. मुंबई, पुणे, सोलापूरनंतर नागपूरमध्येही जीबीएसने बळी घेतलाय. नागपूरमध्ये दोन रूग्णावर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.
जीबीएस आजारामुळे शुक्रवारी संध्याकाळी नागपुरात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय रुग्णाचा शासकीय महाविद्यालय व रुग्णलयात आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातील पारडी शिवारात राहणार व्यक्ती असून 11 फेब्रुवारीला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या दोन्ही हात आणि पायाला लखवा मारला होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्याशिवाय त्याला बीपीचाही त्रास होता. शुक्रवारी प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये आणखी दोन जीबीएसचे रुग्ण आयसीयुत उपचार घेत आहेत.
GBS आजाराविषयी माहिती
हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे जिथे शरीराची रोग प्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करते. स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो.
राज्यात जीबीएसचे किती रूग्ण ?
राज्यात १८० रुग्णांची GBS म्हणून निदान निश्चिती झालेय. त्याशिवाय २७ संशयित रुग्ण आहेत. एकूण ९ मृत्यू झाले आहेत. यापैकी ४ मृत्यू GBS ने झाल्याचे निश्चित निदान झाले असून संशयित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ४२ रुग्ण पुणे मनपा, ९४ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत. ३० रुग्ण पिपंरी चिंचवड मनपा व ३२ रुग्ण पुणे ग्रामीण व ९ इतर जिल्ह्यातील आहेत. यापैकी आतापर्यत १२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४७ रुग्ण आयसीयूमध्ये व २० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
जीबीएस' बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा, ६०६ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर
पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ पैकी १२ गावांमध्ये शुद्ध न केलेले पाणी थेट धरणातून दिले जाते. यातील किरकटवाडी, नांदेड गाव, धायरी, नांदोशी या गावांमध्ये जीबीएस रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे भविष्यात अशुद्ध पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या आजारांना अटकाव घालण्यासाठी १२ गावांना आता शुद्ध पाणी दिले जाणार आहे. प्रत्येकी १०० एमएलडी क्षमता असलेले दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत, यासाठी ८९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हे काम २ टप्प्यांत केले जाणार असल्याने महापालिकेकडून पहिल्या टप्यातील कामासाठी शासनाकडे ६०६ कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.