Gautami Patil News saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil News: गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद होणार? नाशिकच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षाने दिला इशारा

Gautami Patil Lavani Nashik: नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली.

Gangappa Pujari

अभिजित सोनवणे, प्रतिनिधी...

Nashik News: लावणी कलावंत गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. गौतमीच्या कार्यक्रमांमुळे लावणी कलेचा अपमान होत असून त्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी वारंवार पुढे येत असतानाच आता आणखी एका प्रकरणामुळे गौतमी पाटील अडचणीत आली आहे.

इतकेच नव्हेतर राज्यातील एका राजकीय पक्षाने गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू.. (Gautami Patil Event Nashik)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, गौतमी पाटीलच्या नाशिकमधील (Nashik) कार्यक्रमात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. गौतमी पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत यापुढे नाशिक शहरासह जिल्ह्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रमहोऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीची मागणी....

नाशिकमध्ये काल गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत. गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला (Gautami Patil) जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT