Gautami Patil saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, भावुक होत म्हणाली...

Gautami Patil : नाशिकच्या निफाडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती.

Chandrakant Jagtap

Gautami Patil : नाशिकच्या निफाडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती. या कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलने माध्यमांशी संवाद साधला यावेळी तिने व्हायरल झालेल्या व्हिडिओवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू आहे. महिला आयोगाने दखल घेतली त्याबद्दल चांगले वाटले. मला जास्त बोलायचे नाही अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कपडे बदलत असतानाचा गौतमी पाटीलचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलने नाशिकमध्ये पहिल्यांदाच मंचावर नृत्य सादर केले. यावेळी माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की 'मला कायम प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. अजून जास्त प्रेम मिळतंय, छान वाटतंय. माझी बोलण्याची मनस्थिती नाहीये, तरीही मी तुमच्यासमोर आली आहे. लोक माझ्यासोबत आहेत. या गोष्टीचा खूप अभिमान आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात 15 दिवसांनी एक तास पाणी; हजारो महिलांचा घागर मोर्चा, प्रशासनाला घेराव

Food Safety: तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचं कारण; FSSAI च्या नव्या आदेशाने वाढली चिंता

६ खासदारांनी साथ सोडली, आता पुढे काय कारवाई करणार? अरविंद सावंतांनी सांगितला सगळा प्लॅन

Shoking : "मी ईश्वराचा अवतार... म्हणत जाळ्यात ओढलं, IT कंपनीतील महिला मॅनेजरवर सलग २५ वर्ष अत्याचार

Sanchita Ugale Death: 'गरज असताना कोणीही आलं नाही...' अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध अभिनेता भावूक

SCROLL FOR NEXT