Gautami Patil Vehicle Collides with Rickshaw Saam
महाराष्ट्र

गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होणार? अपघातावेळी गौतमी गाडीत होती का? पहाटे नेमकं काय घडलं?

Gautami Patil Vehicle Collides with Rickshaw: पुण्यातील मुंबई बंगळूरू महामार्गावर गौतमी पाटीलच्या वाहनाची रिक्षाला धडक. सुदैवाने जिवितहानी नाही.

Bhagyashree Kamble

  • गौतमी पाटीलच्या वाहनाची रिक्षाला धडक.

  • पुण्यातील मुंबई बंगळूरू महामार्गावर अपघात.

  • सुदैवाने जिवितहानी नाही.

  • गौतमी पाटीलला नोटीस पाठवली.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गौतमी पाटील हिच्या वाहनाचा आणि रिक्षाचा भीषण अपघात घडला. पुण्यातील मुंबई - बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात हा भीषण अपघात घडला होता. हा अपघात पहाटे ५ वाजेच्या दरम्यान, घडला असल्याची माहिती आहे. या अपघातात सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र, रिक्षाचालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून गौतमी पाटीलला नोटीस पाठवली जणार असल्याची माहिती आहे.

गौतमी पाटील वाहन अपघाताचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गौतमी पाटीलच्या वाहनचालकाला तपास करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. वाहना चालकाने कोणते अंमली पदार्थ किंवा मद्यपान केले होते का? याचाही तपास सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहन चालकाचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहे. दरम्यान, गौतमी पाटीलला ३० तारखेला जबाब देण्यासाठी हजर राहण्याची नोटीस पुणे पोलिसांनी दिली आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.

जबाब देण्यासाठी गौतमीला पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली. त्यामुळे तिच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सिंहगड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या २ टीम तपासकामी रवाना करण्यात आल्या आहेत. संतोष उभे असे वाहन चालकाचे नाव असून, अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील वाहनात होती का? याचाही अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC News: ‘आपली एसटी’ कुठंय? आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स

IND Vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी-२० सीरीजसाठी हार्दिकला वगळलं, नेमकं कारण काय?

GK : भारतामधील सर्वात जास्त शिकलेले राज्य कोणते आहे? जाणून घ्या

Shocking : एकाच तरुणीला दोघांनी ब्लॅकमेल करून केला बलात्कार, शिक्षकाच्या काळ्या कृत्यामुळे परभणी हादरली

खरंच मध कधीच खराब होत नाही का?

SCROLL FOR NEXT