लाखो दिलों की धडकन, सबसे कातील, गौतमी पाटीलला अखेर दिलासा मिळालाय.. पुण्यातील नवलेनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमीला क्लीन चिट दिलीय..अपघातावेळी गौतमी कारमध्ये नसल्याचं तपासातून समोर आलं आणि गौतमीवरचं अटकेचं विघ्न टळलंय..
खरंतर 30 सप्टेंबरला पहाटे पुण्याच्या नवलेनगर भागात भीषण अपघात झाला... एका कारने रिक्षाला धडक दिली.. त्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.. असं असतानाही कार चालक पसार झाला.. अपघातातील कार गौतमी पाटीलची असल्याचं समोर आलं.. आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी हस्तक्षेप करत थेट डीसीपींना फोन करुन गौतमीला कधी उचलणार? असा सवाल केला.
पुण्यातील अपघात प्रकरणात थेट मंत्री चंद्रकांत पाटलांची एण्ट्री झाल्यानं तपासाची सूत्रं वेगानं फिरली. पोलिसांनी चालकाला अटक केली.. याच तपासात या रोडवरील 100 पेक्षा जास्त सीसीटीव्हींची तपासणी करण्यात आली.. एवढंच नाही तर कारमधील रक्ताचे नमुने, आवाजाचे नमुने आणि फॉरेन्सिक तपासणी केली.. आणि कारमध्ये गौतमी पाटील नसल्याचं उघड झालं.. त्यामुळं पोलिसांनी गौतमीला क्लीन चिट दिलीय..
मात्र गौतमी पाटील प्रकरणात जेवढी तत्परता मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि पोलिसांनी दाखवली.. तेवढीच तत्परता पुण्यात हैदोस घालणाऱ्या कोयता गँगविरोधात, सर्वसामान्यांवर दहशत पसरवणाऱ्या गुंड निलेश घायवळसारख्या गँगविरोधात कधी दाखवली जाणार?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.