Mumbai-Goa Highway Latest News 
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी; १० तासांपासून वाहतूक ठप्प, गावातील २०० जणांचं स्थलांतर

Mumbai-Goa Highway : अपघाताच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा उपस्थित असून आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन.

अमोल कलये

  • रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ गॅस टँकर पलटी

  • गॅस गळतीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने २०० नागरिकांचे तात्काळ स्थलांतर केले.

  • क्रेनच्या सहाय्याने टँकर हटवण्याचं काम सुरु

  • महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

  • १० तासांपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

Mumbai-Goa Highway Latest News : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एक गॅस टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली. हातखंबा गावाजवळ झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली असून गावातील २०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मागील दहा तासांपासून महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे. क्रेनच्या सहाय्याने गॅस टँकर बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा गावाजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. गॅस टँकर पलटी झाल्याने त्यातून गॅसची गळती होत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. या गंभीर परिस्थितीमुळे ज्या ठिकाणी टँकर पलटी झाला आहे, त्या परिसरातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

घटनेची माहिती मिळताच, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी ते आवश्यक उपाययोजना करत आहेत. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही आणि टँकर बाजूला करून रस्ता सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही असे प्रशासनाने कळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची सखोल चौकशी सुरू

Accident : वऱ्हाडाची बस ट्रकला धडकली, ६ जणांचा जागीच मृत्यू; अनेकजण गंभीर, अपघाताचा व्हिडिओ समोर

Farmer Success Story: कांदा पिकावर रोटार मारलं, केली आल्याची शेती, बीडच्या शेतकरी भावांनी घेतलं २५ लाखाचं उत्पादन

MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT