Gas Cylinder Blast Saam tv
महाराष्ट्र

Gas cylinder explosion : घरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट, आजी-नातू आगीच्या विळख्यात, वाशिममध्ये हळहळ

Washim Gas cylinder explosion : वाशिमच्या राजुरामध्ये रात्रीच्या सुमारास गॅस सिलिंडरच्या स्फोटात ८ वर्षीय चिमुकल्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे.

Namdeo Kumbhar

मनोज जैस्वाल

Gas cylinder explosion : वाशिम जिल्ह्यातील राजुरा गावात रात्रीच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटना घडली आहे. घरात झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ८ वर्षीय चिमुकला आणि आजी होरपळून निघाले. उपचारादरम्यान चरण बोंढारे याचा मृत्यू झाला, तर त्याची आजी गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

ही घटना वाशिममधील राजुरा येथील सुनीता बोंढारे (वय ४५) यांच्या घरी घडली. सुनीता आपल्या ८ वर्षीय नातवासह घरात असताना रात्री अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरात आगीचा भडका उडाला आणि काही क्षणांतच आग संपूर्ण पसरली. आजी आणि नातू या दोघेही आगीच्या विळख्यात सापडले, ज्यामुळे ते गंभीरपणे भाजले गेले. घरातून आरडाओरड ऐकू येताच शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि दोघांना आगीतून बाहेर काढले.

या घटनेनंतर आजी आणि नातवाला तात्काळ वाशिम येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चरण बोंढारे या ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, त्याच्या शरीराचा मोठा भाग भाजल्याने त्याला वाचवणे शक्य झाले नाही. तर सुनीता बोंढारे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग पूर्णपणे विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक तपासात गॅस सिलिंडरमधील गळतीमुळे स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, सिलिंडरच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, स्थानिकांनी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

What not to ask ChatGPT: चुकूनही ChatGPT ला विचारू नका या गोष्टी; फायदा सोडून नुकसान होईल

GK: भारतात सूर्य सर्वात आधी मावळतो कोणत्या गावात मावळतो?

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

SCROLL FOR NEXT