अहमदनगर ः शेतकऱ्यांना पिकवायचं कळतं. मात्र, विकायचं कळत नाही. त्यातूनच त्याच्या शेतमालाची परवड होते. मागील आठवड्यात राज्यात बहुतांशी भागात शेतकऱ्यांना टोमॅटोवर नांगर फिरवावा लागला होता. या आठवड्यात थोडी परिस्थिती बरी आहे. शेतकऱ्यांचा माल मार्केट कमिटीत स्वस्तात विकला जातो. तोच माल फेरीवाल्यांकडून दुप्पट दराने ग्राहकांना खरेदी करावा लागतो.
येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (सोमवारी) घोसाळी, दोडका, गवार, लसणाच्या भावात वाढ झाली. गेल्या आठवड्यापेक्षा घोसाळी पाचशे, दोडका आठशे, तर लसूण एक हजार रुपयांनी महाग विकला गेला. सिमला मिरची, वाटाणा, भेंडी, कारल्याची मागणी वाढली होती. भाज्यांची ८७६ क्विंटल, तर बटाट्याची २७७ क्विंटल आवक झाली. Garlic price hike in Ahmednagar market
टोमॅटोची २०३, वांगी १३, फ्लॉवर ७०, कोबी ४०, काकडी ४४, गवार १०, घोसाळी ४, दोडका ४४, कारली २०, भेंडी १६ , वाल १९, घेवडा ८, बटाटे २७७, लसूण ९, वाटाणा ५०, हिरवी मिरची ७०, सिमला मिरची ४६, शेवगा ६, आले ४४, तसेच दुधी भोपळ्याची २१ क्विंटल आवक झाली.
फळभाज्यांचे क्विंटलचे भाव ः
टोमॅटो साडेपाचशे ते सहाशे, वांगी दीड ते दोन हजार, फ्लॉवर दीड ते दोन हजार, कोबी सहाशे ते सातशे, काकडी साडेसातशे ते एक हजार, गवार साडेपाच ते सहा हजार, घोसाळी अडीच ते तीन हजार, दोडका दीड ते दोन हजार, कारली दीड ते दोन हजार, भेंडी दीड ते दोन हजार, वाल बाराशे ते दीड हजार, घेवडा बाराशे ते दीड हजार, बटाटे एक हजार ते बाराशे, लसूण सहा ते सात हजार, हिरवी मिरची दोन हजार दोनशे ते अडीच हजार, सिमला मिरची साडेसातशे ते एक हजार, शेवगा पाच ते साडेपाच हजार, वाटाणा साडेचार ते पाच हजार, आले दोन हजार दोनशे ते अडीच हजार, दुधी भोपळा साडेसहाशे ते आठशे रुपये. Garlic price hike in Ahmednagar market
पालेभाज्या (शेकडा) ः
मेथी पाचशे ते सहाशे, पालक पाचशे ते सहाशे, शेपू सहाशे ते सातशे, कोथिंबीर साडेचारशे ते सहाशे रुपये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.