विखे पाटलांनी महाविकास आघाडी आतून पोखरली!

डॉ. सुजय विखे पाटील
डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर : नगर जिल्ह्यात विखे पाटील कुटुंबाचे दक्षिणायन सुरू झाले आहे. त्यांनी पारनेर तालुक्यात महाविकास आघाडीला सुरुंग लावला आहे. तेथील शिवसेना विखे यांच्या जवळ आहे. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे तेथे महाविकास आघाडी सुरूवातीपासूनच नाही. लंके यांनी प्रारंभीच तेथील शिवसेनेचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीत आणले होते. त्यांना मुंबईतील घडामोडींमुळे परत पाठवावे लागले.

पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना जवळ केले आहे. याबाबत त्यांनी सुतोवाच केले आहे. राज्यात आघाडी असली तरी इथे आघाडी नाही. यावरून त्यांच्या पुढच्या रणनीतीविषयी कल्पना यावी.

डॉ. सुजय विखे पाटील
अण्णांच्या कानमंत्रामुळे देवरे-लंके वादावर पडणार पडदा!

अवघ्या काही महिन्यांवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे जुने-नवे कार्यकर्त्यांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. विखे पाटील कुटुंबाने दक्षिणायन सुरू केले आहे. त्याचा श्रीगणेशा पारनेरपासून सुरू झाला आहे. त्यानंतर त्यांचे टार्गेट आहे श्रीगोंदा.

खासदार विखे पाटलांनी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करीत कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले. त्यांचे आजोबा कै. बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळापासून श्रीगोंद्यातील कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. ते नातेही वृद्धिंगत केले जात आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारा वर्गही आहे. ही भाजपसाठी जमेची बाजू आहे.

काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब शेलार व जिजाबापू शिंदे यांचीही विखे पाटील यांना साथ आहे. सध्या

राष्ट्रवादीच्या जि.प. सदस्य कोमल वाखारे व पंचायत समिती सदस्य रजनी देशमुख या दोघींचे पतीराज विखे यांना विसरू शकत नाहीत. बाळासाहेब गिरमकर हे शिवाजीराव नागवडे यांना मानणारे असले तरी त्यांची मदार विखे पाटलांवरच आहे. बाळासाहेब नाहाटा हे विखे पाटील यांनाच मानतात.

पाचपुते गट प्लस पॉइंट

आमदार बबनराव पाचपुते हे कोणत्याही पक्षात असले तरी त्यांना मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे. पाचपुते यांनी कितीही पक्ष बदलले असले तरी कार्यकर्ते त्यांच्याच मागे धावतात. विखे यांना खासदारकीसाठी ती ताकद ठरणार आहे. आगामी राजकारण गणिते जुळवण्यासाठी विखे पाटलांनी कंबर कसली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com