अण्णांच्या कानमंत्रामुळे देवरे-लंके वादावर पडणार पडदा!

अण्णांच्या कानमंत्रामुळे देवरे-लंके वादावर पडणार पडदा!
Saam Tv
Published On

अहमदनगर : गेल्या चार दिवसांपासून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोघांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दरबारी हजेरी लावून आपापली कैफियत मांडली. अण्णांनी दोघांना कानमंत्र दिल्याने हे प्रकरण थंड बस्त्यात जाण्याची शक्यता आहे.

अॉडिओ क्लिपप्रकरणामुळे पारनेरच्या तहसीलदार देवरे चांगल्यात चर्चेत आल्या आहेत. त्यांनी हजारे यांची भेट घेत आपली बाजू मांडली. दोन दिवसांपूर्वी आमदार लंके यांनीही देवरे यांच्याबाबतचा अहवाल दाखवून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.Deore-Lanka dispute will be resolved due to Anna Hazare

अण्णांच्या कानमंत्रामुळे देवरे-लंके वादावर पडणार पडदा!
हे प्रेम होतं का फक्त शरीरसंबंधासाठी साधलेली जवळीक

देवरे यांनी अण्णांना राखी बांधत आशीर्वादाची मागणी केली. तुम्ही मला आशीर्वाद द्या, मला संघर्ष करण्याची शक्ती त्यामुळे मिळेल. मी कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार केलेला नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

अण्णांनी तुमच्या वादात मला काहीही स्वारस्य नाही. प्रत्येकाच्या जीवनात संकटे येतात. संकटांना धैर्याने सामोरे जा. आत्महत्येचा विचार सोडून द्या. कोणतीही गोष्ट सबुरीने घ्यायला पाहिजे. तुकाराम मुंडे या अधिकाऱ्यासारखे न डगमगता काम करा. अण्णांना देवरे यांनी मी आत्महत्या करणार नसल्याचे सांगितले. चौकशीला सामोरे जाण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली. अण्णांनी दिलेल्या सल्ल्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.Deore-Lanka dispute will be resolved due to Anna Hazare

माझी लढायची तयारी आहे. मी आज अण्णांना भेटले. माझी बाजू मांडली. चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर

तहसीलदार देवरे यांनी आज माझी भेट घेतली. तसेच कालही आमदार नीलेश लंके यांनी माझी भेट घेऊन माहिती दिली. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले, परंतु अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वादात मला पडण्याची इच्छा नाही.

- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com