यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वेने विक्रमी ३८० विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली.
मध्य रेल्वे २९६ गाड्या चालवणार असून पश्चिम, कोकण आणि दक्षिण पश्चिम रेल्वेही फेऱ्या सोडणार.
कोकण रेल्वेवर कोलाड, खेड, चिपळूण, रत्नागिरीसह अनेक थांबे निश्चित केले.
2023 मध्ये 305 तर 2024 मध्ये 358 गाड्या होत्या; 2025 मध्ये ही संख्या वाढून 380 झाली.
Ganpati Special Train 2025 Mumbai to Konkan : पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वे पूर्णपणे तयार आहे. तब्बल ३८० विशेष रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत. हजारोंच्या संख्येने पुणे आणि मुंबईकर गणेशोत्सवात गावी जातात, त्यामुळे ३८० विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वेंमुळे त्याचा प्रवास सुखकारक होणार आहे. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील उत्सवी प्रवासाची मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे सर्वाधिक 296 सेवा चालवेल. पश्चिम रेल्वे 56 गणपती विशेष फेऱ्या, कोकण रेल्वे (केआरसीएल) 6 तर दक्षिण पश्चिम रेल्वे 22 फेऱ्या चालवेल.
यंदा गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या ३८० फेऱ्यांची घोषणा झाली. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक असून यामुळे उत्सवाच्या काळात भाविक आणि प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवास करता येईल. 2023 मध्ये एकूण 305 गणपती विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या, तर 2024 मध्ये ही संख्या 358 होती.
कोकण रेल्वेवर सेवा देणाऱ्या गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या थांब्यांचे नियोजन कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, मुकांबिका रोड, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल असे करण्यात आले आहे.
गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून 6 सप्टेंबर 2025 पर्यंत साजरा केला जाणार आहे. यानिमित्त होणाऱ्या गर्दीला तोंड देण्यासाठी 11 ऑगस्ट 2025 पासून गणपती विशेष गाड्या धावत आहेत, उत्सव जवळ येताच सेवांमध्ये हळूहळू वाढ केली जात आहे. विशेष गाड्यांचे तपशीलवार वेळापत्रक आयआरसीटीसी वेबसाइट, रेलवन ॲप आणि संगणकीकृत पीआरएस वर उपलब्ध आहे. भारतीय रेल्वे सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे, विशेषतः सणांच्या काळात, जेव्हा मागणी लक्षणीयरीत्या जास्त असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.