धरणांतून नदीपात्रात विसर्ग, गोदावरीला पूर तर कोल्हापूरलाही पुराचा धोका
धरणांतून नदीपात्रात विसर्ग, गोदावरीला पूर तर कोल्हापूरलाही पुराचा धोका  Saam Tv
महाराष्ट्र

धरणांतून नदीपात्रात विसर्ग, गोदावरीला पूर तर कोल्हापूरलाही पुराचा धोका

अभिजीत सोनावणे, संभाजी थोरात

नाशिक: धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नाशकात (Nashik) गोदावरीला (Godavari) पूर आला आहे. गोदावरी नदीने रौद्ररुप धारण केलं आहे. गंगापूर धरणातून यंदाच्या हंगामातील उच्चांकी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 4 हजार 009 क्यूसेक वेगानं पाणी सोडलं आहे. रामकुंड आणि गोदाघाटाचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे.

गोदा घाटाशेजारील रस्त्यावरही पुराचं पाणी आलं आहे. घाटावरील छोट्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तर दारणातून 7 हजार 200 क्यूसेक आणि नांदूरमध्यमेश्वरमधून 23 हजार 905 क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यता आला. आपत्ती निवारण विभागांना अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात मागच्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळ अनेक धरणं तुंडूंब भरली आहेत. हवामान खाच्याने पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज दिला आहे. तिकडे कोल्हापूरमध्ये सलग पडत असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.

धरणातून 8,512 क्युसेक पाणी पंचगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फुटांच्यावर आहे. त्यामुळे पाणी पात्राबाहेर आलं आहे. जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

SCROLL FOR NEXT