''गंगाखेड नगरपालिकेत गटारी पार्टी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा'' राजेश काटकर
महाराष्ट्र

''गंगाखेड नगरपालिकेत गटारी पार्टी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा''

शिवसेनेने धडक नगरपालिकेवर मोर्चा काढत दोशीवर कारवाई मागणी केली आहे.

राजेश काटकर

परभणी: जिल्ह्यातील गंगाखेड (Parbhani Gangakhed) येथे गटारी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बिर्याणी पार्टीनंतर गंगाखेड शहरासह जिल्ह्यात भरात या घटनेचा निषेध होत आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात ही पार्टी आयोजित केल्याचे बोलले जाते, त्या सभागृहाला आज न.पा कर्मचाऱ्यांकडून धूऊन सारवासारव करण्याची प्रकार समोर आलं आहे. शिवसेनेने धडक नगरपालिकेवर मोर्चा काढत दोशीवर कारवाई मागणी केली आहे. ही बातमी काल साम टीव्ही सर्वप्रथम दाखवल्यावर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

गंगाखेड नगरपालिका सभागृहात रविवारी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान गटारी निम्मित चक्क बिर्याणी पार्टीच साजरी केल्याची एक व्हिडिओ क्लिप सद्या जोरदार वायरल होती,गटारी साजरी करण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आणि काही हौसी नगर सेवकांनी नगरपालिका सभागृहाची निवड केली,आणि बिर्याणी पार्टी केली,या बिर्याणी पार्टीचा स्वाद काही हौसी नगरसेवकानी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे, बिर्याणी पार्टी आधीहौसींनी मद्यपान देखील केल्याची चर्चा आहे.

व्हिडीओ वायरल झाल्या नंतर आता काँग्रेस,शिवसेना,मनसे नी कारवाईची मागणी केली. शिवसेनेने तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोमटे याना निलंबित करण्याची मागणी केली. तर आज नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून हे सभागृह धुण्यात आल्याचे फोटो ही आता वायरल होत आहे. नगरपालिका प्रशासनाकडून आणखीन ही मौन बाळगण्यात येत आहे, यासंदर्भात मुख्य अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे घडलेल्या प्रकरणावर पाणी फिरवण्याचा हा प्रकार आहे की काय, अशी चर्चा जिल्हाभर रंगू लागल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

SCROLL FOR NEXT