अकोल्यात दरोडेखोरांच्या टोळीला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक! SaamTvNews
महाराष्ट्र

अकोल्यात दरोडेखोरांच्या टोळीला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक!

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना पोलिसांनी मोठ्या शस्त्र साठ्यासाह अटक केलीय.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील चांदेकर चौकातील एका बँकेजवळ काही जण येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना संशयास्पद स्थितीत आढळल्याने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून झडप घातली असता, दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना पोलिसांनी मोठ्या शस्त्र साठ्यासाह अटक केलीय.

हे देखील पहा :

पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना खबरीकडून अकोल्यातील चांदेकर चौकातील बँक ऑफ इंडिया च्या शाखेवर शस्त्रधारी संशयित चार ते पाच जण दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून चौघांना रंगेहाथ अटक केली. चौघांकडून जवळून दोन लोखंडी कट्टे ज्यात 06 जीवंत राउण्ड काडतुसे आढळून आली. तसेच 10 प्राणघातक शस्त्र ज्यात चार तलवार, कोयता, सूरी, चाकू, भाला, लोखंडी रॉड, 2 कत्ते, फायटर, तसेच नॉयलोंन दोरी, मिरची पूड आदी दरोड्याचे साहित्य आढळून आले.

आरोपींमध्ये दीपक रामु अंभोरे, नितेश महादेव वाकोडे, शुभम संजय गवई आणि अनिल दादाराव भालेराव तसेच एक महिला आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाली आहे. त्या महिला आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT