नकली सोने देऊन फसवणूक करणारी टोळी गजाआड भूषण अहिरे
महाराष्ट्र

नकली सोने देऊन फसवणूक करणारी टोळी गजाआड

दीड किलो सोन्याची पुष्टी केली असता हे नकली असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पिंपळनेर पोलीस ठान्यामध्ये धाव घेतली. व या संदर्भातील सर्व घटना पिंपळनेर पोलिसांना सांगितली.

भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे: साक्री Sakri तालुक्यामध्ये बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीतील काही जणांनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर Pimpalner येथे राहणाऱ्या दीपक प्रभाकर भामरे यांना सोन्याचे पदक दाखवून याप्रमाणेच आणखी सोने Gold शेतामध्ये सापडले. तर ते देखील विकायचे आहे असे सांगून दीपक भामरे यांच्या कडून चार लाख रुपये घेऊन दीड किलो नकली सोने त्यांना दिले. नंतर त्या ठिकाणाहून पोबारा केला. त्यानंतर भामरे यांनी या दीड किलो सोन्याची पुष्टी केली असता हे नकली असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ पिंपळनेर पोलीस Police ठाण्यामध्ये धाव घेतली. या संदर्भातील सर्व घटना पिंपळनेर पोलिसांना सांगितली.

हे देखील पहा-

त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्याशी संपर्क साधला. झालेला संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. साक्री बायपास रोड लगत असलेल्या भंडारा हॉटेलच्या पाठीमागे काही नवीन लोक पालं ठोकून राहत असल्याची माहिती समोर आली. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांचा तपास केला.

तपासादरम्यान  त्यातील दोघा जणांच्या मुसक्या आवळन्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांसह हे कृत्य केले असल्याचे देखील कबुली दिली. तर तसेच त्यांच्याकडे तब्बल साडेसहा लाख रुपये रोकड सह नकली सोन्याचे नाणे देखील पोलिसांना मिळून आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: ३० हजार कोटींसाठी वाद! करिश्मा कपूरला एक्स पतीच्या मालमत्तेतचा किती हिस्सा मिळणार?

Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंचबाईंनी केली पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा; PHOTO पाहा

Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

SCROLL FOR NEXT