Ganeshotsav ST Collection Saam Tv
महाराष्ट्र

Ganeshotsav ST Collection : एसटी महामंडळाला गणराया पावला; रत्नागिरी विभागाचं विक्रमी उत्पन्न

Kokan St News : गणेशोत्सवात रत्नागिरी एसटी विभागाने तब्बल पाच कोटी २३ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले. मुंबई व जिल्ह्यांतर्गत एकूण ३,३०७ जादा बसेस धावत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सोय करण्यात आली.

Alisha Khedekar

  • रत्नागिरी एसटी विभागाचे उत्पन्न पाच कोटी २३ लाखांवर पोहोचले.

  • गणेशोत्सव काळात एकूण ३,३०७ जादा बसेस सोडण्यात आल्या.

  • गेल्या वर्षीपेक्षा तब्बल दोन कोटी ६३ लाखांची वाढ झाली.

  • प्रवाशांसाठी डिजिटल तिकीट, ऑनलाइन बुकिंग व अतिरिक्त सुविधा उपलब्ध होत्या.

गणेशोत्सव हा कोकणातील लोकांसाठी केवळ धार्मिक सण आपुलकीचे क्षण आणि परंपरेला दिलेला नवा आयाम असतो. दरवर्षी या सणासाठी मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागातून लाखो गणेशभक्त कोकणाकडे धाव घेतात. अशा वेळी प्रवाशांच्या सुरक्षित, सुकर आणि वेळेवर प्रवासाची जबाबदारी पेलणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) यावर्षीही मोठ्या तयारीनिशी सज्ज झाले होते. त्याचा थेट फायदा रत्नागिरी विभागाला झाला असून या वर्षी विभागाने तब्बल पाच कोटी २३ लाख ६३ हजार ९३५ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात रत्नागिरी विभागाच्या उत्पन्नाचा आकडा साडेतीन कोटी रुपयांवर थांबला होता. यंदा मात्र तब्बल दोन कोटी ६३ लाख रुपयांची लक्षणीय वाढ झाली असून ही वाढ एस.टी.च्या नियोजनक्षमतेचा आणि प्रवाशांच्या विश्वासाचा पुरावा मानली जात आहे. मुंबईतून मोठ्या संख्येने कोकणात येणाऱ्या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी एस.टी. महामंडळाने यावर्षी विक्रमी २,६९० जादा गाड्या सोडल्या. केवळ मुंबईच नव्हे, तर कोकणातील जिल्ह्यांतर्गत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ६१७ जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३ हजार ३०७ गाड्या उत्सव काळात रत्नागिरी जिल्ह्यातून धावल्या.

कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय कोकणच्या दिशेने रवाना होतात. तिकीट बुकिंगपासून ते वस्तूंची खरेदीची लगबग यासाठी महिनाभर आधीपासून त्यांची तयारी सुरु होते. मात्र रेल्वे बुकिंग सुरु झाल्यापासून अगदी क्षणातच रेलवेच्या तिकीट संपतात. अशा कारणांमुळे कोकणवासीयांना रेल्वेच्या दारात बसून प्रवास करावा लागतो. मात्र प्रवाशांचा त्रास कमी व्हावा यासाठी स्थानिक आमदारांकडून अनेक मोफत एसटी सेवा पुरवल्या गेल्या.

रत्नागिरी विभागाने मिळवलेले हे उत्पन्न केवळ आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. राज्यातील इतर कोकण विभागांमध्येही यावर्षी उत्पन्नवाढ झाल्याचे दिसून आले आहे. प्रवाशांकडून मिळालेला हा प्रतिसाद पाहता पुढील वर्षांमध्ये आणखी जादा गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Songwriter Death: प्रसिद्ध गीतकाराचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

कोहिनूर हिऱ्याची किंमत किती आहे?

Local Bodies Election Supreme Court: ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत होणार निवडणुका | VIDEO

Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

SCROLL FOR NEXT