Ganesh Utsav Kokan x
महाराष्ट्र

गणेशोत्सवात ३८० स्पेशल ट्रेन; पनवेल-चिपळूण दरम्यान धावणाऱ्या ६ ट्रेन कुठे-कुठे थांबणार? वाचा

Kokan Railway : गणेश उत्सवानिमित्त भारतीय रेल्वेने आतापर्यंत ३८० विशेष गाड्यांची घोषणा केली ज्यामध्ये पनवेल - चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.

Yash Shirke

  • गणेशोत्सवासाठी ३८० विशेष गाड्या चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये पनवेल-चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित सेवा आहेत.

  • या विशेष गाड्या २२ ऑगस्टपासून सुरू होऊन सणासुदीच्या काळात प्रवाशांना घरपोच सुविधा देतील.

  • पनवेल-चिपळूण दरम्यानच्या गाड्यांचे थांबे आणि वेळापत्रक NTES अॅप, IRCTC वेबसाइट आणि PRS वर उपलब्ध आहेत.

Ganesh Utsav : भारतीय रेल्वेने २०२५ साली ३८० गणपती विशेष गाड्यांच्या सेवा चालविण्याची घोषणा केली आहे. जी आतापर्यंतची विक्रमी संख्या असून प्रवाशांचा सणासुदीच्या वेळी प्रवास अधिक सुकर व आरामदायी होईल. २०२३ मध्ये एकूण ३०५ गणपती विशेष ट्रेन सेवा चालवण्यात आल्या, तर २०२४ मध्ये ही संख्या ३५८ होती. मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांमधील प्रथमच ३०२ विशेष सेवा उपलब्ध करून देत महाराष्ट्र आणि कोकण विभागातील सणासुदीच्या काळात येणारी प्रचंड प्रवासांची वाढती मागणी पूर्ण केली आहे.

गणेशोत्सव विशेष गाड्यांचे कोकण रेल्वेवरील थांबे पुढीलप्रमाणे नियोजित करण्यात आले आहेत :

कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामथे, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलोवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवी, करमळी, मडगाव जं., कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरूडेश्वर, मूकांबिका रोड, कुंदापूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल.

गणेशोत्सव पूजा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान साजरी करण्यात येणार असून, (श्री गणेशाचे आगमन होणार असून २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत असेल) प्रवासी गर्दी लक्षात घेता २२ ऑगस्ट २०२५ पासून गणेशोत्सव विशेष गाड्यांचे संचालन सुरू करण्यात आले आहे. उत्सव जवळ येत असताना या गाड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे.

पनवेल आणि चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित गणपती विशेष रेल्वे सेवांची घोषणा करण्यात आली आहे.

पनवेल - चिपळूण अनारक्षित गणपती विशेष (६ सेवा)

01159 अनारक्षित विशेष ट्रेन पनवेल येथून दि. ०५.०९.२०२५, ०६.०९.२०२५ व ०७.०९.२०२५ रोजी १६.४० वाजता सुटेल व चिपळूण येथे त्याच दिवशी २१.५५ वाजता पोहोचेल. (एकूण ३ सेवा)

01160 अनारक्षित विशेष ट्रेन चिपळूण येथून दि. ०५.०९.२०२५, ०६.०९.२०२५ व ०७.०९.२०२५ रोजी ११.०५ वाजता सुटेल व पनवेल येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. (एकूण ३ सेवा)

थांबे : सोमटने, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगांव रोड, वीर, सापे वामने, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.

संरचना: ८ मेमू कोच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT