Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

Municipal Election: राज्यात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगलीय. आणि त्याला कारण ठरलंय भाजपनं पुणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलल्याचं कारण, मात्र भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नेमकी काय रणनीती आखलीय..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
 Municipal Election:
Ajit Pawar and Sharad Pawar amid renewed political buzz over a possible NCP reunion ahead of municipal elections.saam tv
Published On

महापालिका निवडणुका जाहीर झाल्या, मात्र मुंबई आणि पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अजित पवारांना सोबत घेणं टाळलंय. त्यामुळं नाराज झालेल्या अजित पवारांनी आता भाजपला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची चर्चा सुरु केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात बैठक झालीय. तर या बैठकीला सुप्रिया सुळेंनीही ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर आलीय.

राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर भाजपनं शिंदेसेनेला सोबत घेण्याची घोषणा केली. मात्र मुंबई महापालिकेत महायुतीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही असतानाही भाजपनं नवाब मलिकांचं कारण देत राष्ट्रवादीसोबत युती करायला नकार दिला. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला फायदा होऊ नये म्हणून भाजपनं दादांना टाळलंय.

 Municipal Election:
Maharashtra Politics: निवडणुका जाहीर होताच शरद पवार गटाला भाजपचा दे धक्का; बड्या महिला नेत्यानं सोडली साथ

त्यामुळे आता अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरु केलीय. तर दादांच्या पक्षाला पवारांसोबत युती करण्याला अमित शाहांनीही होकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र यापूर्वी नगरपालिका निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पहायला मिळालं होतं.

कागल नगरपरिषद

चंदगड नगरपरिषद

शिराळा नगरपरिषद

आंबेजोगाई नगरपरिषद

कुरुंदवाड नगरपरिषद

 Municipal Election:
Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

एका बाजूला स्थानिक नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी युतीबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं स्पष्ट केलंय. काका-पुतण्याच्या सतत होणाऱ्या भेटीगाठी आणि त्यानंतर आता सुरु झालेलं बैठकांच्या सत्रामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपला रोखण्यात यश मिळणार का? यावर राज्याच्या आगामी राजकारणाचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com