eco friendly ganpati, veer maratha ganesh mandal washim saam tv
महाराष्ट्र

Eco-Friendly Ganpati साकारुन 'वीर मराठा' ने सामाजिक बांधिलकी जाेपासात समाजापुढे ठेवला आदर्श

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चुतर्थी निमित्त आज देशभरात भाविकांकडून बाप्पांचा गजर सुरु आहे.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim Ganesh Utsav : पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील वीर मराठा गणेशाेत्सव मंडळाच्या (veer maratha ganesh mandal washim) कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हाताने टाकाऊ वस्तुंपासून बाप्पांची मूर्ती साकारली आहे. या मनमाेहक गणेशमूर्तीची तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चा हाेत आहे. (Maharashtra News)

प्लास्टर ऑफ पॅरीस पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे जलप्रदूषणात मोठी वाढ होत असते. ही गाेष्ट वीर मराठा मंडळाच्या सदस्यांना खटकत होती. यंदाच्या उत्सवात मोठा खर्चही या मंडळाच्या सदस्यांना टाळायचा होता.

त्यातूनच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करायचे असे ठरविले. पुठठे व कागदाचा वापर करून अंदाजे २००० रुपयात ६ फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती कार्यकर्त्यांनी साकारली. या मूर्तीवर काल (सोमवारी) मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अखेरचा हात फिरवला. आज गणेश चतूर्थी निमित्त माेठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी श्रींची प्रतिष्ठापना केली.

दरम्यान भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेण्यास यावे असे आवाहन सागर देशमुख (सदस्य वीर मराठा गणेश मंडळ) यांनी केले आहे.

वीर मराठा गणेशाेत्सव मंडळाने सामाजिक संदेश देत सोबतच कमी खर्चात मूर्ती बनवून उत्सवातील अनाठायी खर्च टाळला असून इतरांपूढे आदर्श ठेवला आहे. या लक्षवेधी गणेशमूर्तीची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT