buldhana news, Ganesh Festival 2023, ganeshotsav 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Ganesh Festival 2023 : डाॅक्टरांची तक्रार, गणेशाेत्सव मंडळाच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा; शहर पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

गणेशाेत्सव मंडळावर कारवाईसाठी डाॅक्टरांनी केली हाेती तक्रार

संजय जाधव

Buldhana Ganpati Utsav : शांतता क्षेत्रात फटाके वाजवून जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एका गणेश मंडळाच्या २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान या कारवाईनंतर मलकापूर शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी (police inspector ashok ratnaparkhi) यांची पोलीस मुख्यालयात बदलीची झाल्याची दबक्या आवाजात शहरात चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)

मलकापूर शहरातील चाळीस बिघा परिसरात अनेक रुग्णालये आहेत. या परिसरातून गणेश मंडळांची मिरवणूक जात असताना फटाके वाजवून परिसरात रुग्णांना त्रास होईल असे वर्तन गणेश मंडळाने केल्याची तक्रार एका डॉक्टराने पाेलीसांत केली.

या तक्रारीवरून मलकापूर शहरातील एका गणेश मंडळावर शांतता क्षेत्रात फटाके वाजवून शांतता भंग केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याचे गुन्हे मंडळाच्या २५ सदस्यांवर दाखल केले.

दरम्यान या कारवाईनंतर मलकापूर शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांनी केल्याची चर्चा दबक्या आवाजात असून रत्नापारखी यांची पोलीस मुख्यालयात बदली झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: नागपुरात बडकस चौक मित्र परिवार तर्फे दहीहंडी स्पर्धेच आयोजन

Horoscope Saturday : गोपाळकाला जाणार या 6 राशींसाठी लाभाचा, प्रवासातून होईल फायदा; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Wall Collapse Tragedy : दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

Mangalgad fort : पावसात ट्रेकिंगचा लुटा मनमुराद आनंद, 'मंगळगड' ची एकदा सफर कराच

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT