yavatmal, ganesh virarjan miravnuk saam tv
महाराष्ट्र

गणपती चालले गावाला...; आज शंभरपेक्षा अधिक मंडळं देणार 'बाप्पा' स निराेप

दहा दिवस मुक्काम झाल्यानंतर गणपती आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले असून आज विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठोड

यवतमाळ : गणपती बाप्पा माेरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघाेषात यवतमाळ जिल्ह्यात आज (रविवार) सार्वजिनक गणेशाेत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पास निराेप देताहेत. यवतमाळ जिल्ह्यात तीन टप्यात विसर्जन (ganpati visarjan) करण्यात येत आहे. यामधील अंतिम टप्प्याचा आज प्रारंभ झाला. (Yavatmal Latest Marathi News)

यवतमाळ जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील रात्री विसर्जन पार पडलं. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात ९८३ मंडळांनी बाप्पाला निरोप दिला. आज (रविवार) शेवटच्या टप्यातील विसर्जन पार पडणार आहे. त्यास प्रारंभ झाला आहे.

नऊ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या विसर्जनासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. जिल्ह्यात विराजमान दोन हजार १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जनाचे नियोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्ष जिल्ह्यात कोरोना महामारीच्या सावटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रथमच यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने सर्वत्र गणेश उत्सवाची धूम पहायला मिळाली.

जिल्ह्यात २ हजार १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाची स्थापना केली होती. दहा दिवस मुक्काम झाल्यानंतर गणपती (ganpati) आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले असून आज विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

Sunday Horoscope : जिवनाचं खरं सार्थक होणार; ५ राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार

अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषदेवर कुणाचं वर्चस्व असणार? 'वंचित' सत्ताधाऱ्यांना धक्का देणार?

SCROLL FOR NEXT