चाकरमानी गणेशभक्तांना रायगडच्या पालकमंत्र्यांचे आवाहन!
चाकरमानी गणेशभक्तांना रायगडच्या पालकमंत्र्यांचे आवाहन!  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

चाकरमानी गणेशभक्तांना रायगडच्या पालकमंत्र्यांचे आवाहन!

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: 10 सप्टेंबर रोजीपासून राज्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. रायगडात गणेशोत्सव (Ganpati Festival) सण हा उत्साहात साजरा होत असतो. हा सण साजरा करण्यासाठी चाकरमानी हे आपल्या गावी येत असतात. मात्र यावर्षीही कोरोनाचे संकट (Coronavirus) अद्यापही आहे. त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस (Corona Vaccine) किंवा 72 तास आधी आर टी पीसीआर (RT-PCR Test) किंवा अँटीजन तपासणी करून यावे जेणेकरून आपल्याच कुटूंबाच्या आरोग्याची काळजी आपण घेऊ शकता. असे आवाहन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चाकरमानी गणेशभक्तांना केले आहे. तसेच याबाबत सक्ती नसून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेत असलेली काळजी असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सव 2021 पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते. पालकमंत्री अदिती तटकरे याच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानी याना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आवाहन केले. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव निमित्त सध्या कोणतेही निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून लावलेले नाहीत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची संभावना वर्तवली आहे. त्यामुळे पुढील संभाव्य धोका ओळखून काही उपाययोजना केल्यास तिसऱ्या लाटेपासून आपण वाचू शकतो. यासाठी गणेशोस्तव साठी येणाऱ्या चाकरमानी भक्तांनी लसीचे दोन डोस घ्यावेत अन्यथा आर टी पीसीआर किंवा अँटीजन तपासणी करून यावे. यासाठी कोणतीही सक्ती केलेली नसली तरी स्वतःचे आणि गावाकडील कुटूंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. यासाठी हे आवाहन करीत असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Vs Shinde | शिंदे आणि ठाकरे गटात हायव्होल्टेज राडा

Thackeray vs Shinde : ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा! हातकणंगलेमध्ये नेमकं काय घडलं?

Heeramandi: हिरोमंडीतल्या लज्जोच्या दिलखेचक अदा, पाहा रिचा चड्ढाचा लुक

DC vs RR, IPL 2024: मुंबईने दिलेल्या संधीचं दिल्ली सोनं करणार का? वाचा राजस्थानविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड

Baramati Lok Sabha: दत्तात्रय भरणेंविरोधात सुप्रिया सुळे यांची तक्रार! दमदाटी केल्याप्रकरणावरुनही सडकून टीका

SCROLL FOR NEXT