Baramati Lok Sabha: दत्तात्रय भरणेंविरोधात सुप्रिया सुळे यांची तक्रार! दमदाटी केल्याप्रकरणावरुनही सडकून टीका

रोहित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केलेला होता. त्यात ते एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना दिसून आले होते.

पुणे : सुप्रिया सुळे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रोहित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केलेला होता. त्यात ते एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना दिसून आले होते. दरम्यान, यानंतर दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याचा आरोप करण्यात येत होता. या सगळ्या प्रकारानंतर दत्तात्रय भरणेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी टीका केली. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी या संपूर्ण प्रकारावर हल्लाबोल केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com