महाराष्ट्र

Jayant Patil News: 'नेत्यांना सुबुद्धी देवो, फोडाफोडीचे राजकारण थांबावे...' जयंत पाटील यांचे गणरायाला साकडे, सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

Maharashtra Politics: राजकीय नेते, सेलिब्रटी यांनीही बाप्पाचं घरी दणक्यात स्वागत केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी

Ganapti Festival 2023:

राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी आणि मोठा सोहळा सुरु आहे. राजकीय नेते, सेलिब्रटी यांनीही बाप्पाचं घरी दणक्यात स्वागत केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले. यावेळी जयंत पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

"राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळो. ज्या भागात पाऊस पडला नाही, तिथे दुष्काळ जाहीर करावा असे म्हणत गणरायाची मोठी ख्याती आहे. ती बुद्धीची देवता मानली जाते. गणरायाने राज्यातील सगळ्या राजकारण्यांना सुबुद्धी देवो, फोडाफोडीचे राजकारण थांबावे..." असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

तसेच केंद्र सरकारच्या महिला आरक्षणाच्या घोषणेबद्दलही जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महिलांच्या आरक्षणाची भूमिका पहिल्यांदा शरद पवार साहेबांनी मांडले. आरक्षण बील मांडल्यावर कळेल की हे बील विधानसभा की लोकसभेसाठी ही आहे. पण आम्ही या बीलाचे स्वागत करू... असे ते यावेळी म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांचे बाप्पाला साकडे..

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरीही लाडक्या गणरायाचे आगमन झाले. यावेळी त्यांनी "सगळ्यांना सुखी आनंदी राहू दे. महाराष्ट्रावर देशावर कोणाची वाईट नजर पडू देऊ नको, असे म्हणत फोडफोडीचे, तोडफोडीचे आणि मन दुखावणारे राजकारण संपू दे.. असे बाप्पाला साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Maharashtra Rain Live News: ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

Video : तुंबलेलं पाणी काढायला आला खुद्द स्पायडर-मॅन, भिवंडीचा Spider-Man सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT