Gadchiroli Flood Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli Flood: गडचिरोलीमध्ये पावसाचा कहर, पूरामुळे १२० गावांचा संपर्क तुटला; घरं-दुकानं पाण्याखाली

Parlkota River Flood: गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी शहरामध्ये शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Priya More

गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला आहे. कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरले आहे त्यामुळे भामरागडमधील घरं- दुकानं आणि शेती पाण्याखाली गेली आहे. या पुरामुळे गडचिरोलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शहरात शिरले असून येथील शंभरहून अधिक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे संसार उपयोगी साहित्य आणि दुकानांमधील सामानांची मोठी नासधूस झाली आहे. या पुरामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला आलेल्या पूराचे पाणी आज सकाळी शहरामध्ये शिरले त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पुरामुळे भामरागड तालुक्यातील १२० गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा घातला आहे. या पुरामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुराची स्थिती लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT