Gadchiroli News : आयुष्याचा खेळ... तापानं २ लेकरं गेली, मृतदेह खांद्यावर घेत आई-वडिलांची १५ किलोमीटर पायपीट, सरकार लक्ष देणार का?

Gadchiroli Tragedy News : दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. दरम्यान ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले.
Gadchiroli News
Gadchiroli NewsSaam tv
Published On

मंगेश भांडेकर, गडचिरोली


गडचिरोली
: मुलांना ताप आल्याने त्यांना उपचारासाठी आई- वडिल एका पुजाऱ्याकडे घेऊन गेले. मात्र या दोन्ही चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला. या घटनेनंतर आई- वडिलांनी रुग्णालय गाठले. पण उशीर झाला होता. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह चक्क खांद्यावर घेऊन १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. या घटनेनं विकासाच्या अख्खा महाराष्ट्र हळहळला असून, सरकार अशा वेदनादायी घटनांकडं लक्ष देणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

हा सगळा प्रकार गडचिरोलीच्या (Aheri) अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे घडला आहे. मृतदेह खांद्यावर नेतानाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल होताच हळहळ व्यक्त होत आहे. बाजीराव रमेश वेलादी (वय ६) व दिनेश रमेश वेलादी (वय साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा) अशी मृत झालेल्या भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. दरम्यान ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव (Gadchiroli) परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान काही वेळाने सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास दिनेशचाही मृत्यू झाला. 

Gadchiroli News
Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांमध्ये IMD कडून 'यलो अलर्ट' जारी, कसं असेल आजचे हवामान? वाचा...

रुग्णवाहिका नसल्याने धरली वाट 

जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई- वडिलांनी नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढली. आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. १५ किलोमीटर पायपीट केल्यानंतर नातेवाईकाची दुचाकी बोलावून पत्तीगावला पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com