Gadchiroli News Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : वैनगंगा नदीत नाव उलटली; ६ महिला बुडाल्या, एका महिलेला वाचविण्यात यश

Gadchiroli News : वैनगंगा नदीच्या गणपूर घाटावरून सदर महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. या दरम्यान अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे यात बसलेल्या सात महिला आणि नावाडी बुडाले

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर
गडचिरोली
: गडचिरोली मधील वैनगंगा नदीच्या गणपूर (रै.) घाटावरून निघालेली नाव पाण्यात बुडाल्याची घटना (Gadchiroli) घडली. यात नावमधील ६ महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृतदेह मिळाला असून अद्याप ५ महिला बेपत्ता आहेत. (Latest Marathi News)

वैनगंगा नदीच्या गणपूर घाटावरून सदर महिला मिरची तोडण्याकरीता (Chandrapur) चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या सहाय्याने जात होत्या. या दरम्यान अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे यात बसलेल्या सात महिला आणि नावाडी (Drowned) बुडाले. नावाडी पोहून बाहेर निघून गेले व एका महिलेला वाचविण्यात आले. परंतु अन्य सहाही महिलांना पोहून बाहेर निघता न आल्याने पाण्यात बुडाल्या आहेत. या घटनेत गणपूर (रै.) येथील पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पाण्यात बुडालेल्या महिलांपैकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून अन्य पाच महिलांचा शोध घेतला जात आहे. चामोर्शी पोलीस (Police) घटनास्थळी पोहचले आहेत. शोधमोहीम वेगात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

Dark Circles Symptoms: डोळ्यांखाली डार्क सर्कल कोणत्या कमतरतेमुळे येतात? ही आहेत लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील त्यांच्या राहत्या घरी पोहोचले

Bengali white saree: दुर्गापूजेला बंगाली महिला लाल बॉर्डर असलेली पांढरी साडी का नेसतात? जाणून घ्या खरं कारणं

SCROLL FOR NEXT