St Bus Video Viral Saam tv
महाराष्ट्र

St Bus Video Viral: हातात छत्री घेऊन चालक चालवतोय बस; अहेरी आगारातील बसचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Gadchiroli News हातात छत्री घेऊन चालक चालवतोय बस; अहेरी आगारातील बसचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Rajesh Sonwane

मंगेश बांदेकर 
गडचिरोली
: गडचिरोलीच्या अहेरी आगारातील छप्पर उडालेली बस यानंतर एका हातात स्टेरिंग व (Gadchiroli) एका हातात वायफर फिरवत असलेला बसचा व्हिडिओ राज्यभर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर याच आगाराचा (St Bus) आणखी एक धक्कादायक नवा व्हिडिओ समोर आला आहे. (Maharashtra News)

एकीकडे राजकीय मंडळी गडचिरोलीत विमानतळ उभारण्याच्या बाता करत असल्या तरी गडचिरोलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे चित्र गेल्या काही दिवसात पाहावयास मिळत आहे. (MSRTC) राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसचा मुद्दा यामुळे समोर येत आहे. पाऊस सुरू असताना बसमध्ये छत गळत असल्याने चक्क चालक बसमध्ये छत्री घेऊन बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नव्या व्हिडिओमुळे अहेरी आगारातील भंगार बसगाड्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. 

प्रवाशांच्या जीवाशी खेळ 

भर पावसात हातात छत्री घेऊन एका हाताने स्टेअरिंग कंट्रोल करणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. अहेरी आगारात असे अनेक प्रकार घडत असतानाही राज्य सरकार मात्र या आगाराला नवीन बस पुरवण्यात दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT