Gadchiroli News Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli News: संतापजनक! कबूतर चोरल्याचा संशय, गडचिरोलीत ४ मुलांना लाथा बुक्यांनी मारहाण; मन सुन्न करणारी घटना, पाहा VIDEO

Gadchiroli Police: गडचिरोलीमध्ये ९ ते १२ वर्षांच्या ४ मुलांना १७ वर्षांच्या मुलाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

कबुतर चोरल्याचा आरोप करत एका चिमुकल्यांना निर्दयीपणे लाथाबुक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोलीमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ९ ते १२ वर्षांच्या ४ मुलांना १७ वर्षांच्या मुलाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलांना मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. कबुतर चोरल्याचा आरोप ठेवत देसाईगंज येथील आयुष अर्जुन स्वर्णकार (१७ वर्षे) या मुलाने अमानुषपाने ४ मुलांना लाथाबुक्याने मारहाण केली. मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

आमगाव येथील आर्यन नरेश बगमारे (९ वर्षे), तन्मय विनोद नागमोती (१० वर्षे), रुषभ विनोद नागमोती (९ वर्षे), डेव्हिड मदन ठाकरे (१२ वर्षे) वर्षे ही ४ मुलं खेळत होते. या मुलांना तुम्ही माझे कबुतर चोरले असा आरोप करत आयुष स्वर्णकारने या चारही मुलांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आणि अक्षरशः लोखंडी सळाखीत उचलून त्यांना फेकले. आयुष अतिशय निर्दयीपणे या मुलांना मारत होता.

आयुष स्वर्णकार या मुलाच्या वडलांचे रक्त तपासणी लॅब असून हा तरुण देसाईगंज येथील कस्तुरबा वॉर्ड येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर देसाईगंज पोलिसांनी रात्रीच आरोपी मुलाचे घर गाठले. तेव्हा घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो देखील अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT