Gadchiroli News Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli : १० कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षलवादीचे आत्मसमर्पण; वरिष्ठ नेता भूपती ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरण

Gadchiroli News : गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आणि संघटनेच्या शीर्ष नेतृत्वात मतभेद वाढले होते. भूपतीने सशस्त्र संघर्ष निष्फळ ठरल्याचे मान्य करून शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले होते

Rajesh Sonwane

गणेश शिंगाडे

गडचिरोली : दीर्घकाळ नक्षल चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समिती पर्यंत पोहोचलेल्या वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने अखेर आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर विविध राज्यात मिळून दहा कोटीहून अधिक बक्षीस होते. १६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ  भूपती हा नक्षलवादी संघटनेचा प्रभावशाली रणनीतिकार मानला जातो. तो अनेक वर्षे महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आणि संघटनेच्या शीर्ष नेतृत्वात मतभेद वाढले होते. भूपतीने सशस्त्र संघर्ष निष्फळ ठरल्याचे मान्य करून शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले होते. जनाधार घटला, शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संघर्ष नव्हे तर संवादच पर्याय आहे, असे त्याने एका पत्रकात म्हटले होते.

अखेर ६० सहकाऱ्यांसोबत आत्मसमर्पण 
त्याच्या भूमिकेला काही नक्षलवादी नेत्यांनी विरोध केला. त्यांनी संघटनेचा महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी याच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, केंद्रीय समितीने भूपतीवर दबाव आणून शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर त्याने संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि अखेर आपल्या साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवणार खाली 

भूपती याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेत गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. तर १६ ओक्टोम्बरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर येथे गोकुळच्या डिबेंचर कपाती विरोधात दूध उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा

Kalyan : खिशातून १,५०,००० रुपयांचा मोबाइल गायब; पठ्ठ्याने बस थांबवून घेतली प्रवाशांची झडती, कल्याणमधील घटना

Diwali Mithai Recipe: बाजारात मिळणारी मिठाई आता घरीच बनवा, या आहेत ४ चविष्ट रेसिपी

ManaChe Shlok: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘मनाचे श्लोक'चं नाव बदललं; 'या' नव्या नावासह होणार चित्रपट प्रदर्शित

Bihar Elections: भाजपचं पुन्हा धक्का तंत्र! विधानसभा अध्यक्ष, मंत्र्यांना डच्चू; तरुणांना उमेदवारी देत खेळला मोठा डाव

SCROLL FOR NEXT