Gadchiroli Rain  Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा हाहाकार, सहाव्या दिवशीही पूरस्थिती कायम; ४ राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

Priya More

मंगेश भांडेकर, गडचिरोली

गडचिरोलीमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी गावांमध्ये शिरले आहे. या पावसामुळे गडचिरोलीमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. ४ राष्ट्रीय महामार्ग आणि एका राज्यमार्गावर पूराचे पाणी आल्यामुळे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीमधील नदी-नाल्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक महामार्ग बंद झाले आहेत. तसेच गोसेखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. परिणामी नदीने पात्र सोडले असून पूराचे पाणी गावामध्ये शिरले आहे. पूराचे पाणी शेतामध्ये गेल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

या पुरामुळे गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-नागपूर, आलापल्ली भामरागड, गडचिरोली-चंद्रपूर हे ४ राष्ट्रीय महामार्ग तर अहेरी-देवलमारी-मोयाबिनपेठा राज्यमार्ग आणि लखमापूर बोरी गणपुर, चामोर्शी-फराळा-मार्कडादेव, झिंगानुर-कल्लेड देचलीपेठा, मानापुर-अंगारा हे ३ प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत. बुधवारी गडचिरोली- नागपूर मार्गावरील पाल नदीवर एका ट्रक चालकाला बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले. महामार्ग बंद असल्यामुळे वाहन चालक एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत.

पूरस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून भाजीपाला, दूध, ब्रेड अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वैनगंगा नदीने धोका पातळी ओलाडली आहे. नदीचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आह. नदीचे रौद्ररुप लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूरामुळे हे महामार्ग बंद -

गडचिरोली-चामोर्शी (राष्ट्रीय महामार्ग)

गडचिरोली-नागपूर, (राष्ट्रीय महामार्ग)

आलापल्ली भामरागड (राष्ट्रीय महामार्ग)

गडचिरोली-चंद्रपूर (राष्ट्रीय महामार्ग)

अहेरी-देवलमारी-मोयाबिनपेठा (राज्य मार्ग)

लखमापूर बोरी गणपुर (प्रमुख जिल्हा मार्ग)

चामोर्शी-फराळा-मार्कडादेव (प्रमुख जिल्हा मार्ग)

झिंगानुर-कल्लेड देचलीपेठा (प्रमुख जिल्हा मार्ग)

मानापुर-अंगारा (प्रमुख जिल्हा मार्ग)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

SCROLL FOR NEXT