Gadchiroli Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Heavy Rain : चौथ्या दिवशीही गडचिरोलीत पूर परिस्थिती कायम; तीन राष्ट्रीय महामार्गासह २३ प्रमुख मार्ग बंदच

Gadchiroli News : विदर्भात पावसाचा हाहाकार सुरु आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर
गडचिरोली
: गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आजच्या चौथ्या दिवशीही कायम आहे. यामुळे जिल्ह्यातून गेलेल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह २३प्रमुख मार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंदच आहेत. दरम्यान रस्त्यावर पोलीस प्रशासनांकडून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत.  

विदर्भात पावसाचा हाहाकार सुरु आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या (heavy Rain) मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये देखील पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर (Gadchiroli) जिल्ह्यातून गेलेले महामार्ग देखील रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातून गेलेले गडचिरोली- चामोर्शी, गडचिरोली- नागपूर, आष्टी- आल्लापल्ली या प्रमुख राष्ट्रीय महामार्गासह २३ मार्ग आजही बंद आहेत. तर पुरामुळे भाजीपाला, दूध, ब्रेड अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली असून गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे वाहन धारकांचे प्रचंड हाल होत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

Brain Tumor: सतत होणारी डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्यूमर तर नाही? न्यूरोसर्जनने सांगितलं कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

Prajaktaraj: प्राजक्ता माळीने नम्रता संभेरावला दिले खास शिंदेशाही तोडे, PHOTO पाहा

Accident: भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक, माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू; वाहनाचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांचा पुन्हा एकदा सतेज पाटील यांना इशारा

SCROLL FOR NEXT